esakal | Haryana - भाजप खासदाराच्या गाडीने चिरडल्याचा आंदोलक शेतकऱ्यांचा आरोप; एक जखमी
sakal

बोलून बातमी शोधा

भाजप खासदाराच्या गाडीने चिरडल्याचा आंदोलक शेतकऱ्यांचा आरोप; एक जखमी

हरयाणात भाजप खासदाराच्या गाडीने आंदोलक शेतकऱ्यांना चिरडण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप शेतकऱ्यांकडून केला जात आहे.

भाजप खासदाराच्या गाडीने चिरडल्याचा आंदोलक शेतकऱ्यांचा आरोप; एक जखमी

sakal_logo
By
टीम ई सकाळ

देशात सध्या लखीमपूरमध्ये मंत्र्यांच्या ताफ्यातील गाडीने चार शेतकऱ्यांना चिरडल्यानं राजकीय वातावरण तापलं आहे. त्यातच आता हरयाणात भाजप खासदाराच्या गाडीने आंदोलक शेतकऱ्यांना चिरडण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप शेतकऱ्यांकडून केला जात आहे. अंबाला इथं आंदोलन सुरु असताना भाजप खासदार नायब सैनी यांच्या कारने आंदोलक शेतकऱ्यांच्या अंगावर गाडी घातली गेली असा आरोप करण्यात आला आहे.

खासदाराने अंगावर गाडी घातल्याने एक शेतकरी जखमी झाला असल्याचं म्हटलं जात आहे. त्याला उपचारासाठी अंबालापासून जवळ असलेल्या नारायणगढमधील एका रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. या घटनेचा व्हिडिओ हरयाणा काँग्रेसने शेअर केला आहे.

कुरुक्षेत्र मतदारसंघातील भाजप खासदार नायब सैनी आणि पक्षाचे इतर नेते एका कार्यक्रमासाठी जाताना ही घटना घडली. कोरोनाशी लढणाऱ्या डॉक्टर आणि फ्रंट वॉरिअर्सचा सत्कार करण्यासाठी खासदारांसोबत काही नेते अंबाला इथं गेले होते असं वृत्त एनडीटीव्हीने दिलं आहे.

loading image
go to top