पाच राज्यातील पराभवानंतर हरियाणामध्ये भाजपचा दणदणीत विजय

वृत्तसंस्था
बुधवार, 19 डिसेंबर 2018

पाच राज्यातील विधानसभा निवडणुकीत लाजिरवाणा पराभव स्वीकारावा लागल्यानंतर चिंतीत असलेल्या भाजपासाठी हरियाणामधून चांगली बातमी आली आहे. हरियाणामध्ये झालेला पाच महानगरपालिकांच्या निवडणुकीत भाजपाने दणदणीत विजय मिळवला आहे. पाचपैकी पाच महानगरपालिकांमध्ये भाजपाचे महापौर निवडून आले आहेत. तसेच भाजपाचेच बहुतांश सदस्यांनीही विजय मिळवला आहे.

चंदीगड - पाच राज्यातील विधानसभा निवडणुकीत लाजिरवाणा पराभव स्वीकारावा लागल्यानंतर चिंतीत असलेल्या भाजपासाठी हरियाणामधून चांगली बातमी आली आहे. हरियाणामध्ये झालेला पाच महानगरपालिकांच्या निवडणुकीत भाजपाने दणदणीत विजय मिळवला आहे. पाचपैकी पाच महानगरपालिकांमध्ये भाजपाचे महापौर निवडून आले आहेत. तसेच भाजपाचेच बहुतांश सदस्यांनीही विजय मिळवला आहे.

हरयाणामध्ये महापौरपदासाठी पहिल्यांदाच थेट लढत झाली. यामध्ये करनाल, रोहतक, पानीपत, यमुनानगर आणि हिसार या पाचही महानगरपालिकांमध्ये भाजपाचे महापौरपदाचे उमेदवार विजयी झाले. एकूणच पाच राज्यातील विधानसभा निवडणुकीत काँग्रेसकडून झालेल्या दारुण पराभवानंतर भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींसाठी हा विजय महत्वाचा आहे.

या विजयानंतर हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधत मतदारांचे आभार मानले आहेत. यावेळी करनाल आणि पानीपत येथे भाजपाच्या महापौरपदाच्या उमेदवारांना मिळालेल्या मताधिक्याचा उल्लेख करत खट्टर म्हणाले की, या मताधिक्यामुळे राज्यातील जनतेने भाजपा सरकारच्या कामकाजावर खूश आहे हे यातून स्पष्ट होत आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Haryana Municipal Election Results BJP clean sweeps all five cities