नवी नियमावली सरकारच्या फायद्याची; चार दिवसांत 1.41 कोटींची वसूली

वृत्तसंस्था
Friday, 6 September 2019

केंद्र सरकारकडून वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहनचालकांच्या दंडात वाढ करण्यात आली. या नव्या नियमावलीची अंमलबजावणी एक सप्टेंबरपासून सुरु झाली आहे. 

नवी दिल्ली : केंद्र सरकारकडून वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहनचालकांच्या दंडात वाढ करण्यात आली. या नव्या नियमावलीची अंमलबजावणी एक सप्टेंबरपासून सुरु झाली आहे. ही नवी नियमावली सरकारच्या फायद्याची असल्याचे दिसत आहे. कारण फक्त चार दिवसांत एक कोटी 41 लाख रुपयांचा दंड वसूल झाला, अशी माहिती देण्यात आली. 

हरियाणा आणि ओडिशा या दोन राज्यातून फक्त चार दिवसांत एक कोटी 41 लाख 22 हजार रूपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. वाहतुकीचे मोडणाऱ्या वाहनचालकांना चाप बसावा यासाठी केंद्र सरकारने मोटार वाहन कायद्यात काही सुधारणा केली आहे. या नव्या सुधारणांतर्गत ओडिशात वाहतुकीचे नवे नियम लागू झाल्यापासून सुमारे 4080 चलनांद्वारे 88 लाख 90 हजार रुपयांचा दंड वसूल झाला आहे. 

तसेच हरियाणात 343 जणांकडून सुमारे 52 लाख 32 हजार रुपयांची दंडवसुली करण्यात आली आहे. दिल्लीमध्ये नवा कायदा लागू झाल्याच्या पहिल्याच दिवशी वाहतूक विभागाच्या पोलिसांनी सुमारे 3900 जणांवर कारवाई केली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Haryana Odisha Police Collect 1 crore 41 Lakh in Fine Within 4 Days of New Motor Vehicles Bill