
हरियाणाच्या पंचकुला येथे एका कुटुंबातील सात सदस्यांच्या आत्महत्येच्या घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. पोलिसांना मिळालेल्या दोन पानांच्या चिठ्ठीतून या दु:खद घटनेचे कारण समोर आले आहे. कुटुंबावर कर्जाचा डोंगर आणि दिवाळखोरीमुळे त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याचे प्राथमिक तपासात दिसून आले आहे. पोलिसांनी याला आत्महत्येचा करार असल्याचा संशय व्यक्त केला असून, तपास सुरू आहे.