Hathras stampede: हाथरसमध्ये हाहाकार! "माझी मुलगी कुठेच सापडली नाही", आईची शोधाशोध...वाचा प्रत्यक्षदर्शी काय म्हणाले?

Hathras stampede update in marahi: दरम्यान उत्तर प्रदेशातील हाथरस येथे झालेल्या भीषण अपघाताबाबत आपण मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याशी बोलल्याची माहिती पंतप्रधान मोदींनी सोशल मीडियावर दिली आहे.
Hathras stampede
Hathras stampedeesakal

उत्तर प्रदेशातील हाथरस जिल्ह्यातील सिकंदरराव परिसरात आयोजित सत्संगात आज मंगळवारी चेंगराचेंगरी झाली, ज्यामध्ये १०० हून अधिक लोकांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, मृतांचा नेमका आकडा अद्याप अधिकृतपणे कळू शकलेला नाही. भोले बाबाच्या सत्संगात मृतदेहांचे ढीर लागले. अनेक लोक आपल्या नातेवाईकांना शोधत आहेत.

हातरथ चेंगराचेंगरीच्या घटनेतील एक प्रत्यक्षदर्शींनी सांगितले, "आम्ही आग्रा येथून सत्संगात सहभागी होण्यासाठी आलो होतो. माझी 15 वर्षांची मुलगी बेपत्ता आहे. आग्र्याहून सुमारे 20-25 लोक आले होते पण आम्हाला माझी मुलगी कुठेच सापडली नाही. पोलीस म्हणतात त्यांना काहीच माहीत नाही..."

Hathras stampede
Hathras Stampade: "बाबाचा ताफा रवाना झाला अन्...."; बचावलेल्या तरुणीनं सांगितली चेंगराचेंगरीच्या घटनेची आपबिती

प्रत्यक्षदर्शी शकुंतला देवी सांगतात, "तिथे भोले बाबाचा सत्संग सुरू होता. सत्संग संपल्यानंतर लगेचच अनेक लोक तिथून बाहेर पडू लागले. रस्ता नादुरुस्त असल्याने चेंगराचेंगरी झाली आणि लोक एकमेकांच्या अंगावर पडले."

हाथरस चेंगराचेंगरीच्या घटनेतील एक प्रत्यक्षदर्शी सुरेश म्हणतो, "मी बदायूंहून माझ्या कुटुंबीयांसह येथे आलो आहे. चेंगराचेंगरीनंतर माझ्या लहान भावाची पत्नी बेपत्ता आहे. आम्हाला कळले की अनेक लोक बेपत्ता आहेत. मी हाक देत होतो. माइक असूनही पण काही उपयोग झाला नाही..."

Hathras stampede
Stampede Hathras: आधी UP पोलीस मग प्रवचनकार... कोण आहेत स्वयंघोषित संत भोले बाबा?, ज्यांच्या सत्संगात मृतदेहांचे लागले ढीग 

दरम्यान उत्तर प्रदेशातील हाथरस येथे झालेल्या भीषण अपघाताबाबत आपण मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याशी बोलल्याची माहिती पंतप्रधान मोदींनी सोशल मीडियावर दिली आहे. उत्तर प्रदेश सरकार सर्व पीडितांना शक्य ती सर्व मदत करणार आहे. यामध्ये ज्यांनी आपल्या प्रियजनांना गमावले आहे त्यांच्यासोबत माझ्या संवेदना आहेत. यासोबतच सर्व जखमी लवकरात लवकर बरे व्हावेत अशी मी कामना करतो, असे मोदी म्हणाले.

उत्तर प्रदेशचे मंत्री लक्ष्मी नारायण चौधरी म्हणाले, "मृत्यू झालेल्यांच्या नातेवाईकांना 2 लाख रुपये आणि जखमींना 50,000 रुपये दिले जातील. जखमींवर मोफत उपचार केले जातील. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ उद्या घटनास्थळी भेट देईन..."

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com