Hathras Stampede : पोलिस ते प्रवचनकार

हा थरस येथील चेंगराचेंगरीने देशभरात खळबळ उडाली असून हजारोच्या संख्येने जमलेल्या भाविकांना सांगणारा प्रवचनकार कोण? याबाबत सर्वाच्या मनात उत्सुकता लागली आहे. साकार हरी बाबा ऊर्फ भोलेबाबा यांचे खरे नाव सूरजपाल आहे.
Hathras Stampede
Hathras Stampedesakal
Updated on

हा थरस येथील चेंगराचेंगरीने देशभरात खळबळ उडाली असून हजारोच्या संख्येने जमलेल्या भाविकांना सांगणारा प्रवचनकार कोण? याबाबत सर्वाच्या मनात उत्सुकता लागली आहे. साकार हरी बाबा ऊर्फ भोलेबाबा यांचे खरे नाव सूरजपाल आहे. १७ वर्षापूर्वी त्यांनी सत्संग सुरू केला. पोलिस खात्यातील नोकरी सोडून ते विश्‍वहरी भोलेबाबा बनले. पतियाली येथे त्यांनी आश्रम स्थापन केला. कमी काळातच गरीब व वंचित समाजावर छाप पाडणाऱ्या भोलेबाबांच्या अनुयायांची संख्या लाखांच्या संख्येत पोचली. भोलेबाबा यांचे शिष्य उत्तर प्रदेशशिवाय राजस्थान, मध्य प्रदेशमध्ये आहेत.

मूळ रुपाने कांशीरामगरच्या पतियाली गावचे स्वयंघोषित भोलेबाबा उत्तर प्रदेश पोलिस खात्यात कार्यरत होते. १८ वर्ष नोकरी केल्यानंतर त्यांनी व्हीआरएस घेतला आणि आपल्या गावातच झोपडी बांधून राहू लागले. त्यांच्या दाव्यानुसार त्यांना देवाचा साक्षात्कार झाला आणि ते अध्यात्माकडे झुकले गेले.

त्यानंतर उत्तर प्रदेश तसेच लगतच्या राज्यांत प्रवचन देऊ लागले. स्वत: भोलेबाबा हे लहानपणी आपण वडिलांसमवेत शेतीकाम केल्याचे सांगतात. तरुणपणी ते पोलिस खात्यात दाखल झाले. त्यांची नियुक्ती डझनभर पोलिस ठाण्यात होत असताना इंटिलिजन्स यूनिटमध्ये काही काळ काम केल्याचे बोलले जाते. आपल्या अंगी ईश्‍वराचा अंश असल्याचा ते दावा करतात. त्यांनी संपूर्ण आयुष्य मानवकल्याणासाठी व्यतित करण्याचा निर्णय घेतला. ते म्हणतात, मी कोठेही जात नाही, परंतु भक्त मला बोलावतात. भक्ताच्या विनंतीमुळे मी वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन प्रवचन देत असतो. साकार हरी यांना पतियाली बाबा नारायण साकार हरी नावानेही ओळखले जाते. प्रवचनाच्या वेळी त्यांचंी पत्नी देखील सोबत असते.

कोरोनाचे नियम मोडले होते

दोन वर्षापूर्वी जेव्हा देशात कोरोनाची लाट आली तेव्हा उत्तर प्रदेशातील फर्रुखाबाद येथे मे २०२२ मध्ये सत्संगचे आयोजन केले होते. तेव्हा जिल्हा प्रशासनाने केवळ ५० जणांची परवानगी दिली होती. मात्र कायदा मोडत त्यांनी ५० हजारांपेक्षा अधिक नागरिक जमविले. त्यामुळे शहरातील व्यवस्था कोलमडून पडली. याप्रकरणी जिल्हा प्रशसनाने आयोजकाविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. नारायण साकार हे पत्नीसमवेत सत्संग करतात. त्यांच्या संत्संगाला ‘मानवमंगल मिलन सदभवान समागम’ असे म्हटले जाते.

सुटाबुटातील बाबा

बाबासंदर्भात काही जण म्हणतात ते ठाणेदार होते तर काही जण ते ‘आयबी’मध्ये होते, असेही म्हणतात. कारण बाबांना पोलिसांची कार्यशैली चांगलीच ठाऊक आहे आणि या आधारावरच त्याने स्वयंसेवकाची मोठी फौज तयार केली. बाब हे अन्य साधूसारखे भगवेवस्त्र धारण करत नाहीत, ते महागडा गॉगल, पांढरा शर्ट पँट घालून एखाद्या फिल्मी नायकाप्रमाणे वावरत असतात. बाबांचा पेहराव अनेकांना आकर्षित करतो.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.