हाथरसची घटना म्हणजे देशावरील न पुसला जाणारा डाग ; अभिनेता फरहान अख्तरची उद्विग्नता

युगंधर ताजणे
Wednesday, 30 September 2020

दिल्लीतील निर्भया प्रकरणासारखे हे प्रकरण असून यात चार तरुणांनी एका तरूणीवर बलात्कार केला. या प्रकार इतका भयानक होता की, त्या नराधम तरुणांनी बलात्कार केल्यावर  तिची जीभ छाटून मान मोडली.  यामुळे अत्यंत गंभीर स्थितीत असलेल्या या तरुणीची दोन आठवड्यांपासून जीवनमृत्यूशी झुंज सुरु होती. अखेर २९ सप्टेंबर रोजी तिची प्राणज्योत मालवली.

मुंबई - कुणाही सर्वसामान्य माणसाचे मन सुन्न करुन टाकणारी घटना उत्तर प्रदेशातील हाथरस येथे घडली. त्या पीडितेवर बलात्कार करुन तिच्यावर अमानुषपणे अत्याचार करण्यात आले. मात्र उपचार घेत असताना तिची प्राणज्योत मालवली.  दिल्लीच्या  सफदरजंग येथील रुग्णालयात त्या पीडितेवर उपचार सुरु होते. यापूर्वी स्वरा भास्कर, कंगना रणौत, मीरा चोप्रा, रिचा चड्ढा, रितेश देशमुख, अक्षय कुमार यांसारख्या अनेक कलाकारांनी या घटनेवर प्रतिक्रिया दिली होती.

या घटनेचे तीव्र पडसाद राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रावर उमटले. अनेकांनी दोषींवर तातडीने कारवाईची मागणी केली आहे. तसेच देशाची राजधानी सुरक्षित नसल्याचे काहींनी म्हटले आहे. यासगळ्या परिस्थितीवर प्रसिध्द दिग्दर्शक फरहान अख्तर याने तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली आहे. हाथरसची घटना म्हणजे देशावरील न पुसला जाणारा डाग आहे. असे म्हणुन त्याने आपली उद्विग्नता मांडली आहे. उत्तर प्रदेशमधील हाथरस येथील सामूहिक बलात्कार प्रकरणातील पीडित तरुणीचा दोन आठवड्यानंतर उपचारांदरम्यान मृत्यू झाला. दिल्लीच्या सफदरजंग येथील रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरु होते. या अमानुष घटनेवर अभिनेता फरहान खान याने संताप व्यक्त केला आहे. “ही घटना पाहून असं वाटतंय की माणूसकीचा आता अंत झाला आहे. त्या पीडित तरुणीला न्याय द्या”, अशी मागणी त्याने केली आहे.

दिल्लीतील निर्भया प्रकरणासारखे हे प्रकरण असून यात चार तरुणांनी एका तरूणीवर बलात्कार केला. या प्रकार इतका भयानक होता की, त्या नराधम तरुणांनी बलात्कार केल्यावर  तिची जीभ छाटून मान मोडली.  यामुळे अत्यंत गंभीर स्थितीत असलेल्या या तरुणीची दोन आठवड्यांपासून जीवनमृत्यूशी झुंज सुरु होती. अखेर २९ सप्टेंबर रोजी तिची प्राणज्योत मालवली.

हेही वाचा ; इरफान खानची पत्नी सुतापाची वादग्रस्त मागणी, 'भारतात सीबीडी ऑईल कायदेशीर करा'

“हाथरसमधील या अमानुष घटनेमुळे देशावर एक न पुसला जाणार डाग पडला आहे. अशा गुन्हेगारांना लपवणाऱ्या लोकांना स्वत:ची लाज वाटायला पाहिजे. पीडितेच्या कुटुंबियांना घरात कोंडून तिच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले. हा प्रकार पाहून असं वाटतंय की माणूसकीचा आता अंत झाला आहे.” अशा आशयाचं ट्विट करुन फराहन खान याने आपला राग व्यक्त केला. त्यांचं हे ट्विट सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Hathras will forever remain a blemish on the fabric of this nation.