"दहा दिवसांनंतर चाचणीची गरज नाही"; केंद्राच्या होम आयसोलेशनसाठी नव्या गाईडलाइन्स

होम आयसोलेशनसाठी काही महत्वाच्या नव्या गाईडलाईन्स जाहीर करण्यात आल्या आहेत.
Home Isolation
Home Isolation

नवी दिल्ली : केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं गुरुवारी होम आयसोलेशनमधील सौम्य लक्षणं असलेल्या कोविड रुग्णांसाठी नव्या गाईडलाईन्स जाहीर केल्या आहेत. या नव्या गाईडलाइन्सनुसार, रुग्णांचा दहा दिवसांचा होम आयसोलेशनचा कालावधी संपल्यानंतर त्यांना पुन्हा कोविड टेस्ट करण्याची गरज नाही.

Home Isolation
रशियाच्या तिन्ही लशींपासून मिळणार सुरक्षाकवच? मृत्यूची शक्यता जवळपास कमी

आरोग्य मंत्रालयानं म्हटलं की, असिम्प्टमेटिक किंवा सौम्य लक्षण ही प्रयोगशाळेत कोविडची टेस्ट केल्यानंतरच रुग्णाला सौम्य लक्षण किंवा काहीच लक्षण नाहीत हे सांगितलं जाऊ शकतं. घरातच असताना स्वतःला त्रास होत नाही किंवा ऑक्सिजन सॅच्युरेशन पातळी ९४ च्या वर आहे यावरुन हे ठरवलं जाऊ शकत नाही. ज्या रुग्णांमध्ये तापाची लक्षण आहेत पण त्यांना श्वास घ्यायला त्रास होत नाही. तसेच त्यांचं ऑक्सिजन लेवल ९४च्यावर आहे, अशा रुग्णांना होम आयसोलेशनचा सल्ला दिला जातो. तसेच जे रुग्ण होम आयसोलेशनमध्ये आहेत त्यांची काळजी घेण्यासाठी चोवीस तास एक काळजीवाहू व्यक्ती घरात उपलब्ध असणं गरजेचं आहे. रुग्णाच्या होम आयसोलेशनच्या काळात रुग्णाची काळजी घेणाऱ्या या व्यक्तीचा रुग्णाच्या डॉक्टरांशी सातत्याने संपर्क असणं गरजेचं आहे.

६० वर्षांवरील आणि कोमॉर्बिड रुग्ण होम आयसोलेट होऊ शकतात का?

त्याचबरोबर ६० वर्षांवरील व्यक्ती तसेच ज्या व्यक्तींना काही गंभीर आजार आहेत यामध्ये हृदयरोग, उच्च रक्तदाब, डायबेटिज, सेरेब्रोव्हॅस्कुलर डिसीज, फुफ्फुस-किडनीचे आजार असलेल्या रुग्णांच्या मेडिकल ऑफिसरकडून व्यवस्थित सर्व तपासण्या केल्यानंतरच त्यांना होम आयसोलेशनचा सल्ला दिला जाऊ शकतो.

जास्त काळ ताप नसेल तर तातडीने डॉक्टरांशी संपर्क साधावा

जर रुग्णाला दिवसातून चार वेळा या प्रमाणे जास्तीत जास्त पॅऱासिटॅमोल (650mg) गोळ्यांचा डोस देऊनही ताप थांबत नसेल तर अशा रुग्णांनी ताबडतोब आपल्या फिजिशिअन डॉक्टरांशी संपर्क साधावा. यानंतर डॉक्टर त्यांना नॉन स्टेरॉईडल अँटि इनफ्लेमोटरी ड्रग देऊ शकतात.

होम आयसोलेशनमध्ये रेमडिसिव्हीर घेऊ नये

त्याचबरोबर कुठल्याही तपासणीदरम्यान रुग्णाला जर रेमडिसिव्हीर इंजेक्शनची गरज सांगितली असेल तर हे इंजेक्शन केवळ डॉक्टरांनीचं देण गरजेचं आहे, ते ही रुग्ण रुग्णालयात उपचार घेत असेल तरच. रेमडेसिव्हीर औषधाचा वापर रुग्ण घरी असताना केला जाऊ नये, असंही नव्या गाईडलान्समध्ये सांगण्यात आलं आहे.

जास्त त्रास होत असेल तर तातडीने डॉक्टरांशी संपर्क करा

तसेच जर होम आयसोलेशनमधील रुग्णाला श्वास घेण्यास त्रास होत असेल, छातीत दुखत असेल, ऑक्सिजनची पातळी कमी होत असेल तसेच मानसिकरित्या गोंधळल्यासारखी स्थिती असेल तर अशा रुग्णानं ताबडतोब आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधणं गरजेचं आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com