बैल आणि म्हशींच्या कत्तलीवर बंदी आणावी; दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल 

पीटीआय
Wednesday, 26 February 2020

गोहत्याबंदीची व्याप्ती वाढवून त्यात बैल आणि म्हशींच्या कत्तलीला प्रतिबंध करण्याच्या मुद्द्याचाही समावेश करावा, यासाठीची याचिका दिल्ली उच्च न्यायालयात सोमवारी दाखल झाली. 

नवी दिल्ली - गोहत्याबंदीची व्याप्ती वाढवून त्यात बैल आणि म्हशींच्या कत्तलीला प्रतिबंध करण्याच्या मुद्द्याचाही समावेश करावा, यासाठीची याचिका दिल्ली उच्च न्यायालयात सोमवारी दाखल झाली. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलो करा ई-सकाळचे ऍप 

गोहत्येवर बंदी असेल तर त्या जातीतील नर आणि वंशजाच्या हत्येवरही प्रतिबंध असायला हवा, असा युक्तिवाद याचिकेत केला आहे. सिंह किंवा मोर अशा अन्य जातींमधील नर व मादीच्या अशा दोन्हीच्या शिकारीवर बंदी घालण्यात आली आहे. त्याचप्रमाणे बैल आणि म्हशींचेही कत्तलीपासून संरक्षण केले पाहिजे, असेही याचिकेत म्हटले आहे. 

बैल, म्हैस यांची उपयुक्तता संपल्यानंतर ते भाकड समजले जातात. मात्र, त्यानंतरही त्यांचा वापर शेतीच्या कामांसाठी आणि प्रजनन प्रक्रियेत होऊ शकतो. या प्राण्यांचे शेण आणि मूत्र हे शेतीत खत म्हणून उपयुक्त आहे. यासंबंधीची याचिका गेल्या वर्षी सर्वोच्च न्यायालयात दाखल केली होती. पण, तेथे दिल्ली उच्च न्यायालयात जाण्याचे निर्देश देण्यात आले, असे याचिकादाराने सांगितले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: HC seeks prohibiting slaughter of bulls buffaloes