Karnataka Election Result: किंगमेकरचं दुकान बंद ! कर्नाटकच्या निकालाने 'या' पक्षाचा बाजार उठवला

Karnataka Election Result
Karnataka Election Result
Updated on

कर्नाटकात किंगमेकरची भूमिकेत असलेल्यांचं दुकान बंद झालं आहे. कर्नाटकने काँग्रेसला पूर्ण बहूमत दिलं आहे. कर्नाटकमध्ये काँग्रेस 136 जागांवर आघाडीवर आहेत. तर भाजप ६४ जागांवर आघाडीवर आहे. भाजपने ४५ जागा जिंकल्या आहेत तर किंगमेकरच्या भूमिकेत असलेला जेडीएस २० जागांवर आघाडीवर आहे. त्यामुळे काँग्रेस भाजप आणि जेडीएसचे देखील तोंड बंद केले आहे.

कर्नाटक निवडणुकीत झालेला पराभव नरेंद्र मोदी - अमित शहा यांना मोठा धक्का मानला जात आहे. हे दोघे कर्नाटकात तळ ठोकून बसले होते. शहा आणि मोदींनी मोठ्या प्रमाणात कर्नाटकात रॅलीचे आयोजन केले होते. मात्र तरी देखील कर्नाटकमधील जनतेने भाजपला नाकारले आहे.

जेडीएस प्रमुख एडी कुमारस्वामी निकालांपूर्वी मुख्यमंत्री पदाची मागणी केली होती. त्रिशुंक परिस्थिती आली झाली जो मुख्यमंत्री पद देईल त्यांनाच पाठींबा देऊ, असे कुमारस्वामी यांनी म्हटले होते. मात्र त्यांच दुकान बंद झाल आहे. काँग्रेसला सत्ता स्थापन करण्यासाठी आता कुणाच्याही पाठींब्याची गरज नाही.

Karnataka Election Result
Unemployment Rate: 'या' देशांमध्ये आहे सर्वाधिक बेरोजगारी, भारताचाही समावेश टॉप-5 मध्ये

जर भाजप आणि काँग्रेसने त्यांच्या अटी मान्य केल्या तर ते पक्षाला पाठिंबा देण्यास तयार आहोत. राज्याचे मुख्यमंत्री करावे ही कुमारस्वामी यांनी मुख्य अट होती. कर्नाटकचे दोन वेळा मुख्यमंत्री राहिलेले कुमारस्वामी मतदानाच्या रात्रीच सिंगापूरला रवाना झाले होते. आपल्या भेटीपूर्वी ते म्हणाले होते की, मला विश्वास आहे की जेडीएस किमान ५० जागा जिंकेल आणि मी माझ्या अटी मान्य करणाऱ्या पक्षासोबत युती करण्यास ते तयार आहे.

मात्र कुमारस्वामी यांचे दुकान बंद करण्यात आले आहे. जेडीएसला एकून मतदानाच्या केवळ १३ टक्के मतं मिळाले आहेत.

Karnataka Election Result
Karnataka Election Result 2023: दणदणीत विजयानंतर कर्नाटकचा मुख्यमंत्री कोण होणार? खर्गे म्हणाले...

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Mysuru suicide case shocks Karnataka as family dies before wedding
Karnataka seeks water from Maharashtra
DK Shivakumar Net Worth
DK Shivakumar new Chief Minister of Karnataka
Marathi News Esakal
www.esakal.com