अजबच! एलियनसारखं दिसण्यासाठी त्यानं कापले चक्क नाक आणि ओठ

scared women.
scared women.

आजकाल तरुणांमध्ये टॅट्यू(Tatto) गोंदवण्याची मोठी फॅशन आहे. मात्र, फ्रान्सच्या (France) एका तरुणामध्ये आपलं संपूर्ण शररीरचं बदलण्याचं वेड संचारलं आणि त्यानं चक्क ते करुनही दाखवलं. अॅन्थोनी लोफ्रेडो (Anthony Lofredo) असं या तरुणाचं नाव आहे. अॅन्थोनी एलियन (Alien) (परग्रहावरील माणूस) या संकल्पनेवरुन इतका प्रभावित झाला की त्यानं चक्क आपले ओठ, नाक, कान आणि जीभचं कापून टाकली. इतकंच नव्हे तर त्याने आपल्या संपूर्ण शरीरावर टॅट्यू आणि पिअर्सिंग करुन घेतलं आहे. त्याच्या या कारनाम्यामुळे तो सोशल मीडियावर एलियन नावानंच प्रसिद्ध झाला आहे. अॅन्थोनीला २ लाखांहून अधिक लोक इन्स्टाग्रामवर फॉलो करतात. 

एन्थोनी लोफ्रेडो आपल्या लुक्समुळे सर्वांना आश्चर्यचकीत करत असतो. त्याच्या या कारनाम्याला त्याच्या आईचाही पाठिंबा आहे. मदर्स डेला त्यानं आपल्या आईसोबत एक फोटो पोस्ट केला होता. त्याने इन्स्टाग्रामवर लाईव्ह सेशन दरम्यान सांगितलं होतं की, तो आपली संपूर्ण त्वचाच हटवू इच्छितो त्याऐवजी धातूची त्वचा बसवून घ्यायची इच्छाही त्यानं व्यक्त केली आहे. लेफ्रोडेनं सांगितलं होतं की, त्याने स्पेनला जाऊन आपलं नाक मॉडिफाय करुन घेतलं होतं, कारण असं करण्याला फ्रान्समध्ये परवानगी नाही. 

अॅन्थोनी हा कधीकाळी सुरक्षा रक्षकाची नोकरी करत होता. हे काम त्याच्या आवडीचं नव्हतं, त्यामुळे त्याला जाणीव झाली की आपल्याला जगायचयं तसं आपण जगत नाही. यानंतर तो ऑस्ट्रेलियाला गेला आणि त्याने स्वतःमध्ये बदल घडवण्यास सुरुवात केली. आता तो पूर्णपणे बदलून गेला आहे. 

अॅन्थोनीचं म्हणणं आहे की त्याला स्वतःला भीतीदायक दिसणं आवडतं. तो सुरुवातीला शरिरामध्ये बदल करण्याबाबत विचार करत असे आता ते त्यासाठी नेहमीचं झालं आहे. अॅन्थोनीनं म्हटलं की त्याला गडद दिसणं आवडतं. त्याने आपल्या लाईव्ह सेशनमध्ये हे देखील सांगितलं की त्यानं आपला वरचा ओठ काढून टाकला आहे त्यामुळे बोलायला अडचण होत आहे. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com