मंकीपॉक्सविरुद्ध 'WHO’ चे पाच उपाय, गाईडलाईन्स जारी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

health news Five WHO Remedies Against Monkey Pox corona delhi
मंकीपॉक्सविरुद्ध 'डब्लूएचओ’ चे पाच उपाय

मंकीपॉक्सविरुद्ध 'WHO’ चे पाच उपाय, गाईडलाईन्स जारी

नवी दिल्ली : कोरोनाची साथ कमी होत असतानाच जगात मंकीपॉक्सचा धोका वाढू लागला आहे. २७ देशांमध्ये ७८० जणांना हा आजार झाल्याचे निदान चाचण्यांमधून झाल्याने मंकीपॉक्सचा मंकीपॉक्सचा मानव-ते-मानव संसर्ग थांबवण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेने (डब्लूएचओ) पाच प्रतिबंधक उपाय सुचविले आहेत. ‘डब्लूएचओ’च्या पाच प्रदेशांसह २७ देशांमध्ये मंकीपॉक्सचा प्रसार झाला आहे. १३ मे ते २ जून या कालावधीत प्रयोगशाळांमध्ये तपासलेले ७८० नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. यामुळे हा आजार रोखण्यासाठी ‘डब्लूएचओ’ने तातडीने पावले उचलण्यास सुरुवात केली आहे.

‘‘सध्याची स्थिती नाजूक असून मंकीपॉक्सचा संसर्ग लवकर ओळखण्यासाठी आपण सार्वजनिक आरोग्य साधनांचा वापर करू शकतो. जेथे हा आजार नवा आहे, अशा देशांमध्ये त्याचा प्रसार रोखणे अत्यंत आवश्यक आहे,’’ असे ‘डब्लूएचओ’च्या अधिकाऱ्याने म्हटले आहे.

‘डब्लूएचओ’च्या पाहणीनुसार मंकीपॉक्सच्या संसर्गाची कारणे : लैंगिक आरोग्य, प्राथमिक किंवा दुय्यम आरोग्य सुविधांमध्ये इतर आरोग्य सेवा.

'डब्लूएचओ’ने सुचविलेले पाच प्रमुख उपाय

  • मंकीपॉक्स बद्दल जनजागृती करणे

  • मानवाकडून मानवाला होणारा संसर्ग थांबविणे. रुग्णांचे विलगीकरण करणे, नागरिकांशी चर्चा करणे आणि संसर्ग रोखण्यासाठीच्या उपायांवर त्यांचे विचार जाणून घेणे.

  • काळजीवाहू कर्मचाऱ्यांचे संरक्षण करणे. मंकीपॉक्सचे नमुने घेणारे, बाधित रुग्णांची देखभाल करणाऱ्यांना योग्य माहिती असल्याची, त्यांना योग्य प्रकारची वैयक्तिक संरक्षण उपकरणे देणे

  • प्रतिबंधक उपाय व लसीकरण उपलब्ध असले तरी ज्यांना सर्वांत जास्त धोका आहे त्यांच्यासाठी याचा योग्य वापर केला पाहिजे.

  • संशोधन व विकासाच्यादृष्टीने चर्चा करण्यासाठी ‘डब्लूएचओ’ जागतिक पातळीवर मोठ्या बैठकीचे आयोजन करणार आहे. विषाणूजन्यविज्ञानापासून, निदान, उपचारात्मक आणि लसीकरण अशा सर्व बाबींवर संशोधन करण्यात येईल.

Web Title: Health News Five Who Remedies Against Monkey Pox Corona Delhi

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top