
नवी दिल्ली : मुख्य निवडणूक आयुक्त तसेच निवडणूक आयुक्तांच्या नियुक्ती संदर्भातील कायद्याच्या वैधतेला आव्हान देणाऱ्या याचिकेवरील सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी टळली आहे. सदर याचिकेची बुधवारी प्राधान्याने सुनावणी घेतली जाईल, असे याआधी झालेल्या सुनावणीवेळी सर्वोच्च न्यायालयाने सांगितले होते. मात्र ही याचिका पटलावर येऊ शकली नाही.