Himachal Pradesh Disaster: ३३३ घरे गेली वाहून , ८० लोकांचा मृत्यू; हिमाचल प्रदेशमध्ये पावसाचा तांडव

Himachal Pradesh Landslide: हिमाचल प्रदेशमध्ये पावसाचे अक्राळ-विक्राळ रुप,मुख्यमंत्र्यांची राष्ट्रीय आपत्ती घोषित करण्याची मागणी.
धर्मशाला (हिमाचल प्रदेश) : ढगफुटी झाल्यानं येथे मोठा हाहाकार माजला असून अनेक घरं आणि रस्त्यांवरील वाहनं पाण्याच्या प्रचंड वेगामुळे वाहून गेली आहेत.
धर्मशाला (हिमाचल प्रदेश) : ढगफुटी झाल्यानं येथे मोठा हाहाकार माजला असून अनेक घरं आणि रस्त्यांवरील वाहनं पाण्याच्या प्रचंड वेगामुळे वाहून गेली आहेत.ANI
Updated on

Himachal Pradesh Landslide: हिमाचल प्रदेशमध्ये होणाऱ्या मुसळधार पावसामुळे सामन्य जनजीवन अत्यंत प्रभावीत झालंय. रस्ते वाहून गेलेतं. अनेक घरं आणि पुल पाण्याच्या जलद प्रभावामुळे वाहून गेले आहेत. जागो-जागी भुस्खलन होतंय. शासकीय शाळांनी आपल्या सुट्टीच्या वेळापत्रकात बदल केला आहे. या सुट्ट्या १० जुलैपासून सुरु झाल्या आहेत. सध्या हिमालयातील स्थिती भयावह करणारी आहे.

हिमाचल प्रदेशमध्ये तीन दिवसापासून होणाऱ्या मुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. पावसाची तीव्रता इतकी जास्त आहे की मुख्यमंत्री सुखविंदर सिंह सुक्खू यांनी राष्ट्रीय आपत्ती घोषित करण्याची मागणी त्यांनी केली आहे.

पावसामध्ये हिमाचलप्रदेशचं जवळपास १०५० कोटी रुपयांचं नुकसान झालंय. या नैसर्गिक आपत्तीमध्ये आतापर्यंत एकूण ८० लोकांचा मृत्यू झाला असून, ९२ लोकं गंभीररित्या जखमी झाले आहेत. यातं १३ मृत व्यक्तींचे शरीरं बुधवारी (दि. १२ जुलै) मिळाले.

मुसळधार पावसामुळे आतापर्यंत एकूण ७९ घरं नष्ट झाले आहेत, तर ३३३ घरांना काही प्रमाणात नुकसान झालंय. माहितीनुसार, राज्यात ४१ ठिकाणी भुस्खलन झालंय, तर २९ फ्लॅश फ्लडच्या घटना समोर आल्या आहेत. मुसळधार पावसामुळे रस्ते बंद झाल्याने हिमाचल प्रदेश लोक सेवा आयोगाने एसपीएएसची २३ जुलैला होणारी परीक्षा रद्द केली आहे.

धर्मशाला (हिमाचल प्रदेश) : ढगफुटी झाल्यानं येथे मोठा हाहाकार माजला असून अनेक घरं आणि रस्त्यांवरील वाहनं पाण्याच्या प्रचंड वेगामुळे वाहून गेली आहेत.
Lokmanya Tilak Award: "PM मोदींना टिळकांचं चरित्र वाचायला पाठवणार"; संजय राऊतांची टीका

पावसामुळे राज्यातील १२९९ रस्ते बंद

हिमाचल प्रदेश डिसॅस्टर मॅनेजमेंट अथॉरिटीनुसार मंगळवारी (दि.११ जुलै) संध्याकाळपर्यंत राज्यातील १२९९ रस्ते बंद झाले होते. याशिवाय मंडी-कुल्लू नॅशनल हायवे २१, ग्रम्फू-लोसर नॅशनल हायवे ५०५, कुल्लू-मनाली नॅशनल हायवे ०३ आणि नॅशनल हायवे ७०७, या रस्त्यांवर दळणवळण ठप्प झालंय. जोरदार पावसामुळे हिमाचल प्रदेश परिवहन मंडळाच्या ८७६ बसेसचा मार्ग प्रभावित झाला असून, ४०३ बसेस काही ठिकाणी अडकल्या आहे. (Latest Marathi News)

मागच्या ५० वर्षातील सर्वात मोठी पाऊस

मुख्यमंत्री सुक्खू यांनी मंगळवारी हवाई सर्वेक्षण केले होते. सर्वे केल्यानंतर त्यांनी सांगितले की मागील ५० वर्षात हिमाचलप्रदेशमध्ये असा पाऊस पडला नव्हता. (Latest Marathi News)

धर्मशाला (हिमाचल प्रदेश) : ढगफुटी झाल्यानं येथे मोठा हाहाकार माजला असून अनेक घरं आणि रस्त्यांवरील वाहनं पाण्याच्या प्रचंड वेगामुळे वाहून गेली आहेत.
Lokmanya Tilak Award: "PM मोदींना टिळकांचं चरित्र वाचायला पाठवणार"; संजय राऊतांची टीका

त्यांनी सांगितले की बाहेरच्या राज्यातून कुल्लू, मनाली आणि बाकीच्या ठिकाणी असून, सुरक्षित आहेत. माध्यमांच्या अहवालानुसार पावसामुळे जलशक्ती विभागाला ३५०.५० कोटी, पीडब्ल्यूडी विभागाला ६१६.०८ कोटी, उद्यानविद्या विभागाला ७० कोटी आणि अर्बन विभागाला ३.१५ कोटीचे नुकसान झाले आहे.

धर्मशाला (हिमाचल प्रदेश) : ढगफुटी झाल्यानं येथे मोठा हाहाकार माजला असून अनेक घरं आणि रस्त्यांवरील वाहनं पाण्याच्या प्रचंड वेगामुळे वाहून गेली आहेत.
Uday Samant: "हॉस्पिटलमध्ये किती मीटिंग झाल्या, मला पण सांगावे लागेल..."; सामंतांचा उद्धव ठाकरेंना इशारा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com