

चेन्नई (पीटीआय) : तमिळनाडूमधील अनेक भागांमध्ये गुरुवारी मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे प्रशासनाच्या वतीने चेन्नईसह राज्यातील अनेक शाळांना सुटी जाहीर करण्यात आली. पावसामुळे तमिळनाडूमधील जलाशयांच्या पाणीसाठ्यातही झपाट्याने वाढ होऊ लागल्याने अनेक धरणांतून पाणी सोडण्यात आले आहे.