उत्तराखंडमध्ये पावसामुळे जनजीवन विस्कळित

वृत्तसंस्था
रविवार, 29 जुलै 2018

मुसळधार पावसामुळे शनिवारी उत्तराखंडमधील विशेषतः डोंगराळ प्रदेशातील जनजीवन विस्कळित झाले. दरडी कोसळण्याच्या घटनांमुळे अनेक रस्ते व शाळा बंद ठेवण्यात आल्या. 

डेहराडून-  मुसळधार पावसामुळे शनिवारी उत्तराखंडमधील विशेषतः डोंगराळ प्रदेशातील जनजीवन विस्कळित झाले. दरडी कोसळण्याच्या घटनांमुळे अनेक रस्ते व शाळा बंद ठेवण्यात आल्या. 

राज्यातील जॉलीग्रॅंट येथे पावसाची 145. 1 मिमी. नोंद झाली. ऋषीकेशमध्ये 132.4, पुरोलामध्ये 110, रुरकीत 106 व डेहराडूनमध्ये 98.6 मि. मी. पाऊस पडल्याचे हवामान विभागाने सांगितले. पुढील 72 तासांत राज्यातील बहुतेक भागांत मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज व्यक्त केला असून, हिमालयातील तीर्थक्षेत्रांना भेट देण्याऱ्या भाविकांनी सुरक्षा बाळगण्याचे आवाहन केले आहे.

राज्यात बुधवारपासून (ता. 25) पडत असलेल्या पावसामुळे पुरोलात शाळेची भिंत कोसळली. मात्र, शाळेला सुटी असल्याने सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही. दरडी कोसळ्याने अनेक रस्ते व महामार्ग बंद आहेत. गंगा, यमुना, तोन्स व कमल नद्या दुथडी भरून वाहत आहेत.

Web Title: Heavy rains across Uttarakhand cause Life is disrupted