गुजरातमध्ये मुसळधार पाऊस! पंतप्रधान मोदींनी शेअर केला मंदिराचा VIDEO

सकाळ न्यूज नेटवर्क
Wednesday, 26 August 2020

गुजरातमध्ये सध्या मोठा मुसळधार पाऊस सुरु आहे.

नवी दिल्ली- गुजरातमध्ये सध्या मोठा मुसळधार पाऊस सुरु आहे. यामुळे गुजरातमधील बऱ्याच नद्या दुथड्या भरून वाहत आहेत. काही ठिकाणी पूर परिस्थितीही निर्माण झाली आहे. तसेच जवळजवळ 100 भागांत हाय अलर्ट ( high alert) देण्यात आला आहे. अशातच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (PM Narendra Modi) एक व्हिडिओ शेअर केला आहे.  हा व्हिडिओ  पंतप्रधान मोदींनी ट्विटरवर टाकला आहे. ज्यामध्ये त्यांनी मोढेराच्या सुर्य मंदिराचा (Sun Temple In Modhera) एक व्हिडिओ शेअर केला आहे. हा ट्विटरवरील व्हिडिओ मोठ्या प्रमाणात वायरल (Viral Video) होत आहे. 

या व्हिडिओमध्ये मुसळधार पाऊस पडताना दिसत आहे. पावसाचं हे पाणी पायऱ्यावरून पाणी खाली येतानाचं सुंदर दृश्य दिसत आहे. पंतप्रधान मोदींनी या व्हिडिओत पाऊस नसतानाचा एक फोटोही टाकला आहे. त्यामूळे पाऊस नसताना आणि असतानाचा मोठा फरक दिसत आहे.  'मोढेराचे प्रसिध्द सूर्य मंदिर पावसामुळे नेत्रदीपक दिसत आहे.' हे कॅप्शन देत मोदींनी मोढेराच्या सुर्य मंदिराचा व्हिडिओ शेअर केला आहे. 

आतापर्यंत गुजरातमध्ये वार्षिक सरासरीच्या 106.78 टक्के पाऊस झाला आहे. पाणलोट क्षेत्रात मुसळधार पावसामुळे राज्यातील 205 धरणे 90 टक्के भरली गेली आहेत तर 70 धरणे 70 टक्के भरली आहेत. मुसळधार पावसामुळे सरदार सरोवर धरणातील (Sardar Sarovar Dam) पाण्याची पातळी 128.93 मीटरपर्यंत पोहोचली आहे. अजून सरदार सरोवर धरणातील पाण्याची पातळी १० मीटरने वाढली तर हे धरण 100 टक्के भरेल.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Heavy rains in Gujarat Prime Minister Modi shared VIDEO of the temple