
चेन्नई : बंगालच्या उपसागरातील ‘फेइंजल’ चक्रीवादळ उत्तर तमिळनाडू-पुदुच्चेरीतील कराईकल आणि महाबलिपूरमदरम्यान किनारा ओलांडण्याची शक्यता आहे. या वेळी वाऱ्यांचा वेग ७० ते ८० कि.मी. प्रतितास राहण्याची शक्यता असून तो ९० कि.मी. प्रतिासपर्यंतही पोचू शकतो. दरम्यान, चक्रीवादळामुळे चेन्नई आणि परिसरात पावसाने हजेरी लावली.