
मनाली : हिमाचल प्रदेशात गेल्या बारा तासांपासून पाऊस आणि हिमवर्षाव होत असून, २०० पेक्षा जास्त रस्ते बंद करण्यात आले आहेत. मनालीतील अनेक गावांमधील वीजपुरवठा खंडित झाला असून, पाणीटंचाईलाही सामोरे जावे लागत आहे. रस्त्यांवर पाणी आल्याने अनेक वाहने वाहून जात असल्याचे चित्र आज पहावयास मिळाले.