
श्रीनगर : हिमवृष्टीमुळे काश्मीर खोऱ्यात जनजीवन विस्कळित झाले असून रेल्वे वाहतूक, विमान सेवा खंडित होण्याबरोबरच श्रीनगर-जम्मू राष्ट्रीय महामार्ग देखील बंद राहिला. काश्मीरमध्ये कालपासून मध्यम ते अधिक प्रमाणात हिमवृष्टी झाल्याची नोंद झाली आहे. यात श्रीनगर शहरासह खोऱ्यातील मैदानी भागांचा समावेश आहे. दक्षिण काश्मीरमध्ये मैदानी भागात प्रचंड प्रमाणात हिमवृष्टी तर मध्य काश्मीरमध्ये मध्यम स्वरूपाची हिमवर्षाव झाला आहे. उत्तर काश्मीरमध्ये मैदानी भागात किरकोळ ते मध्यम हिमवृष्टीची नोंद झाली. हिमवृष्टीचा आनंद घेताना पर्यटकांना अडकून पडण्याची वेळ आली. मात्र लष्कराने कारवाई करत त्यांना सुखरूपपणे बाहेर काढले.