Heeraben Modi Demise : आई असूनही शेवटपर्यंत त्यांनी कधीच नरेंद्र मोदींना एकेरी हाक मारली नाही! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Heeraben Modi
Heeraben Modi Demise : आई असूनही शेवटपर्यंत त्यांनी कधीच नरेंद्र मोदींना एकेरी हाक मारली नाही!

Heeraben Modi Demise : आई असूनही शेवटपर्यंत त्यांनी कधीच नरेंद्र मोदींना एकेरी हाक मारली नाही!

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आई हिराबेन यांचं आज निधन झालं. त्याबद्दल त्यांनी ट्वीट करत माहिती दिली आहे. मोदींनी हिराबेन यांच्या १०० व्या वाढदिवसामध्ये एक भावनिक लेखही लिहिला होता. (PM Narendra Modi shares a blog about his mother)

हा ब्लॉग शेअर करताना मोदी (PM Narendra Modi) म्हणाले होते, आई हा फक्त एक शब्द नाही, तर अनेक भावनांचा मिलाप आहे. आज १८ जून रोजी, माझी आई हिराबा (PM Narendra Modi's mother Heeraben Modi) वयाच्या १०० व्या वर्षात प्रवेश करत आहे. या खास दिवशी मी माझ्या भावना, आनंद आणि कृतज्ञता व्यक्त करत आहे. या ब्लॉगच्या माध्यमातून आपल्या आईबद्दलचे काही किस्से, आईच्या काही आठवणीही सांगितल्या आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या लेखात आपली आई कशा पद्धतीने संबोधते, याबद्दल सांगितलं होतं. पंतप्रधान मोदी म्हणाले, "माझी आई माझ्याशी गुजरातीतच बोलते. गुजरातीमध्ये एकेरी हाक मारताना 'तू' म्हणतात आणि तुम्हाला म्हणायचं असल्याचं 'तमे' म्हणतात. मी जेवढे दिवस घरी राहिलो, तेवढे दिवस मला आई 'तू' म्हणायची. पण जेव्हा मी घर सोडलं, माझा मार्ग बदलला. त्यानंतर तिने कधीही मला एकेरी हाक मारली नाही. आजही ती मला 'तमे' असं म्हणते".