esakal | ४० बड्या अमेरिकन कंपन्यांचा भारतासाठी मदतीचा हात; बायडन म्हणाले...
sakal

बोलून बातमी शोधा

JOE BIDEN

४० बड्या अमेरिकन कंपन्यांचा भारतासाठी मदतीचा हात; बायडन म्हणाले...

sakal_logo
By
टीम ई-सकाळ

वॉशिंग्टन : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेशी झुंजत असलेल्या भारताच्या मदतीसाठी अमेरिका मिशन मोडवर आला आहे. अमेरिकी प्रशासनाचे विविध विभाग अशी क्षेत्र शोधत आहेत ज्यामध्ये भारताला मदतीची गरज आहे. याशिवाय सर्व प्रशासकीय बंधनंही दूर केली जात आहेत. त्याचबरोबर भारताला जितक्या लवकर शक्य होईल तितक्या लवकर वैद्यकीय मदत पुरवण्याकडे लक्ष दिलं जात आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन म्हणाले, "भारताने अमेरिकेच्या लोकांची गरजेच्यावेळी मदत केली होती. आता अमेरिका कोरोनाच्या संकटाशी लढण्यासाठी भारताची मदत करेन" काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी फोनवरुन चर्चा करताना बायडन यांनी हे विधान केलं. या दोघांमध्ये सुमारे ४५ मिनिटं फोनवरुन चर्चा झाली.

मोदींशी चर्चेनंतर बायडन यांनी ट्विट केलं आणि म्हणाले, "भारतानं आमची मदत केली होती. आता आम्ही भरताची मदत करत आहोत" भारतात कोरोनाच्या संसर्गाबाबत ढीलेपणा दाखवल्याचं सांगत बायडन प्रशासानाच्या विविध विभागांकडून टीका होत होती. त्यानतंरही अमेरिकेच्या अध्यक्षांच्या कार्यालयाने अर्थात व्हाईट हाऊसने ऑक्सिजन, कोरोना लसीसाठीचा कच्चा माल, जीवरक्षक औषधं आणि पीपीई कीट भारतात पाठवण्याचं आवाहन केलं आहे.

दरम्यान, बायडन प्रशासनाने हेही म्हटलं की, "या मदतीच्या बदल्यात अमेरिका भारताकडून राजकीय पाठिंबा नकोय" अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते नेड प्राइस म्हणाले, "भारतासोबत आमचा जागतिक व्यापार धोरण सहकार्य करार आहे." परराष्ट्र मंत्री एंटनी ब्लिंकन म्हणाले, "कोणत्याही राजकीय समर्थनासाठी आम्ही भारताची मदत करत नाही आहोत. ही गरजवंतांच्याप्रती आमची प्रतिबद्धता आणि अमेरिकेच्या मानवीय नेतृत्वाची झलक आहे"

अमेरिकेच्या ४० बड्या कंपन्या मदतीसाठी सरसावल्या

भारताप्रती एकजुटता दाखवण्यासाठी अमेरिकेच्या ४० बड्या कंपन्या मदतीसाठी पुढे आल्या आहेत. याअंतर्गत भारताची मदत करण्यासाठी साधनसामुग्री जमवण्यासाठी जागतीक टास्क फोर्सची निर्मिती केली जाणार आहे. डेलाईटचे सीईओ पुनीत रंजन म्हणाले, "अमेरिकेतील विभिन्न व्यापारी संघटना मिळून काही आठवड्यांमध्ये २०,००० ऑक्सिजन कन्संट्रेटर भारतात पाठवतील. याशिवाय या कंपन्या प्रशासनासोबत मिळून औषधं, लस, ऑक्सिजन आणि अन्य जीवन रक्षक उपकरणं देखील पाठवणार आहेत. या आठवड्यात मोठ्या संख्येने अमेरिकनं कंपन्या भारताच्या मदतीसाठी पुढे आल्या आहेत. आमच्याकडून जी मदत करता येईल ती आम्ही देण्याचा पूर्ण प्रयत्न करु"

गिलियड वाढवणार रेमडेसिव्हीरचं उत्पादन

औषध निर्माता कंपनी गिलियड सायन्सेसने म्हटलं की, "कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा परिणाम झालेल्या भारतात रेमडेसिव्हीरची उपलब्धता वाढवण्यासाठी आपल्या सहकाऱ्यांना तांत्रिक मदत आणि औषधांमध्ये वापरण्यात येणारी सामुग्री उपलब्ध करुन दिली जाईल. याशिवाय कंपनी भारताला ४,५०,००० अतिरिक्त डोस उपलब्ध करुन देईन"

भारताच्या मदतीसाठी अमेरिकनं खासदारांची मोहीम

राजकारणापलिकडे जात अनेक अमेरिकन खासदार मोकळेपणानं भारताच्या मदतीसाठी पुढे आले आहेत. त्यांनी बायडन प्रशासनानं भारताला तात्काळ प्रत्येक शक्य ती मदत उपलब्ध करुन देण्याची विनंती केली आहे. भारताला एक जवळचा सहकारी आणि महत्वपूर्ण साथीदार सांगताना खासदार एडम सिफ म्हणाले, "जेव्हा कोरोनाच्या संसर्गामुळे अमेरिकेतील रुग्णालयांची स्थिती बिघडली होती तेव्हा भारतानं तात्काळ मदत देऊ केली होती. त्यामुळे बायडन प्रशासनानं भारताच्या मदतीचा निर्णय घेतल्याने आम्ही त्यांचे आभारी आहोत."

कॅलिफोर्निया देणार ऑक्सिजन

अमेरिकेतील एक राज्य कॅलिफोर्निया भारताला ऑक्सिजनचा पुरवठा करणार आहे. भारताला ऑक्सिजनची खेप पाठवण्याचं विस्तृत विवरण जाहीर करत कॅलिफोर्नियाचे गव्हर्नर गैविन न्यूसम म्हणाले, "या आजाराविरोधात लढणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला चांगल्या वैद्यकीय सुविधा मिळण्याचा हक्का आहे. भारताच्या लोकांना आता मदतीची गरज आहे आणि आम्ही ती करणार आहोत"

loading image