Loksabha 2019 : करकरे यांची हत्या माझ्या शापामुळे : साध्वी प्रज्ञासिंह 

Hemant Karkare treated me badly, Sadhvi Pragya singh controversial statement at bhopal
Hemant Karkare treated me badly, Sadhvi Pragya singh controversial statement at bhopal

भोपाळ : "महाराष्ट्राच्या दहशतवादविरोधी पथकाचे (एटीएस) तत्कालीन प्रमुख अधिकारी हेमंत करकरे यांची हत्या माझ्या शापामुळे झाली,'' असे वादग्रस्त विधान मालेगाव बॉंबस्फोटातीव आरोपी व भोपाळमधील भाजपच्या उमेदवार साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांनी केले. या प्रकरणी मध्य प्रदेश निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल झाली आली असून, चौकशी सुरू झाली आहे. 

मालेगाव बॉंबस्फोटप्रकरणी तुरुंगात असताना करकरे यांनी अत्यंत वाईट वागणूक दिल्याने मी त्यांना शाप दिला होता, असेही त्या म्हणाल्या. मुंबईवर 26/11 रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या वेळी करकरे यांची दहशतवाद्यांनी हत्या केली.

गुरुवारी (ता. 18) एका पत्रकार परिषदेत बोलताना साध्वींनी हे वादग्रस्त विधान केले. "करकरे यांनी मला खोटेपणाने तुरुंगात डांबले होते. कोणतेही पुरावे नसल्याने मला सोडून द्यावे, असे मी त्यांना सांगत होते. पुरावे शोधून काढीन, पण साध्वीला सोडणार नाही, असे ते म्हणाल्याचा आरोप प्रज्ञासिंह यांनी केला. ""तुमचा सर्वनाश होईल, सर्व काही नष्ट होईल, असा शाप मी त्यांना दिला होता. ठीक सव्वा महिन्याने सुतक लागते. ज्या दिवशी मी तुरुंगात गेले त्या दिवशीच त्यांना सुतक लागले होते. त्यानंतर बरोबर सव्वा महिन्याने दहशतवाद्यांनी त्यांना मारले आणि त्याच दिवशी सुतक संपले. ते त्यांच्या कर्माने गेले,'' अशी मुक्ताफळेही त्यांनी उधळली. दहशतवाद्यांशी लढताना वीरमरण आलेल्या हेमंत करकरे यांना "हुतात्मा' संबोधण्यासही त्यांनी नकार दिला. 

साध्वीच्या विधानाचा सर्वत्र निषेध 
मुंबईवरील दशतवादी हल्ल्यात हुतात्मा झालेले "एटीएस'चे माजी प्रमुख हेमंत करकरे यांच्याबद्दल साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांनी केलेल्या धक्कादायक वक्तव्याचे सर्व स्तरांतून निषेधाचे सूर व्यक्त होत आहे. याच वेळी प्रज्ञासिंह यांचे हे विधान म्हणजे त्यांचे वैयक्ति मत असल्याची सारवासारव भाजपने केली आहे. ""दहशतवाद्यांशी धैर्याने लढताना करकरे यांना मरण आले, यावर भाजपचा विश्‍वास आहे. भाजप नेहमीच त्यांच्या हौताम्याचा सन्मान करीत आला आहे. साध्वी प्रज्ञासिंह यांनी करकरे यांच्याविषयी केलेले विधान त्यांचे वैयक्तिक असून, तुरुंगवासात अनेक वर्षे शारीरिक व मानसिक त्रासाला सामोरे जावे लागल्याने त्या तशा बोलल्या असतील,'' असे पक्षाने म्हटले आहे. 

दिग्विजयसिंह (भोपाळचे काँग्रेसचे उमेदवार) : निवडणूक आयोगाने हुतात्म्यांच्या बलिदानावर वक्तव्य करण्यास मनाई केली आहे. मी याबाबत काही बोलणार नाही, पण हेमंत करकरे एक प्रामाणिक आणि कर्तव्यदक्ष अधिकारी होते. दहशतवादी हल्ल्यात त्यांनी मुंबईच्या नागरिकांसाठी हौतात्म्य पत्करले. 

आयपीएस संघटना : अशोकचक्र सन्मानप्राप्त दिवंगत "एटीएस'चे प्रमुख हेमंत करकरे यांनी दहशतवाद्यांशी लढताना देशासाठी सर्वोच्च त्याग केला आहे. संबंधित उमेदवाराने त्यांच्याविषयी केलेल्या अपमानास्पद विधानाचा आम्ही सर्व अधिकारी निषेध करीत आहोत. आपच्या सर्व हुतात्म्यांच्या बलिदानाचा सन्मान करायला हवा. 

रणदीप सुरजेवाला (काँग्रेसचे प्रवक्ते) : हा हुतात्म्यांचा अपमान आहे. 

वरुण ग्रोव्हर (सेक्रेड गेमचा लेखक) : मी निःशब्द झालो आहे. भाजपच्या भोपाळच्या उमेदवार आणि दहशतवादातील आरोपी 26/11च्या हल्ल्यातील आपले हिरो "एटीएस'चे प्रमुख हेमंत करकरे यांच्या मृत्यूची उघडपणे इच्छा व्यक्त करीत आहेत. यात कसाब आणि त्याची टोळीही साध्वी प्रज्ञासिंह यांची साथीदार आहे. 

प्रज्ञासिंह यांची माफी 
"माझ्या वक्तव्यामुळे देशाच्या शत्रूंचा फायदा होईल, असे वाटल्याने मी माझे वक्तव्य मागे घेत आहे आणि वक्तव्याबद्दल मी माफी मागते,'' असे साध्वी प्रज्ञासिंह यांनी शुक्रवारी म्हटले आहे. तसेच, हेमंत करकरे हे निःसंशयपणे देशासाठी हुतात्मा झाले आहेत. जे काही झाले त्या माझ्या वेदना होत्या, असेही त्यांनी म्हटले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com