
रांची : झारखंड मुक्ती मोर्चाचे नेते हेमंत सोरेन यांनी राज्याचे चौदावे मुख्यमंत्री म्हणून आज शपथ घेतली. सोरेन यांच्या शपथविधी सोहळ्याच्या निमित्ताने ‘इंडिया’ आघाडीचे शक्तिप्रदर्शन पाहायला मिळाले. राज्यपाल संतोषकुमार गंगवार यांनी सोरेन यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. आजच्या सोहळ्यात केवळ सोरेन यांचाच शपथविधी पार पडला.