

Uttarakhand
esakal
"देवभूमी उत्तराखंडमध्ये देशभरातून येणाऱ्या सर्व भाविकांचे आणि पर्यटकांचे मनःपूर्वक स्वागत आहे. उत्तराखंड ही आस्था, संस्कृती आणि निसर्गाचा अमूल्य वारसा आहे. सर्व श्रद्धाळूंनी देवभूमीच्या या शांत वातावरणात आपल्या यात्रेचा नितांत आनंद घ्यावा आणि कोणत्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास ठेवू नये," असे जाहीर आवाहन उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी केले आहे. मंगळवारी सचिवालयात आयोजित करण्यात आलेल्या एका उच्चस्तरीय बैठकीत ते बोलत होते.
या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी चारधाम आणि हेमकुंड साहिब यात्रेला येणाऱ्या यात्रेकरूंच्या सुख-सुविधांना सर्वोच्च प्राधान्य देण्याचे निर्देश प्रशासकीय अधिकाऱ्यांना दिले आहेत.