

This Himalayan Shrine Is Winning Hearts of Newlyweds – Here's Why
esakal
उत्तराखंडमधील रुद्रप्रयाग जिल्ह्यातील 'त्रियुगीनारायण मंदिर' हे भगवान शिव आणि माता पार्वतीच्या विवाहाचे पवित्र स्थान असल्याने आजवर देशातील एक आघाडीचे 'वेडिंग डेस्टिनेशन' म्हणून ओळखले जात होते. परंतु, आता उत्तराखंडमधील आणखी एका अत्यंत जागृत आणि निसर्गरम्य मंदिराची यात भर पडणार आहे. अलकनंदा नदीच्या पात्रात पिलर्सवर दिमाखात उभे असलेले आणि चारधामांची रक्षक मानले जाणारे माता धारी देवीचे (Dhari Devi) मंदिर आता लवकरच एका भव्य वेडिंग डेस्टिनेशनच्या रूपात जगासमोर येणार आहे.