Amarnath Yatra: अमरनाथ यात्रेला कडक सुरक्षेचे ‘कवच’; ड्रोन, हवाई संरक्षण प्रणालीचा वापर,अतिरिक्त जवानही तैनात
Kashmir Security: पहलगाम हल्ल्यानंतर अमरनाथ यात्रेसाठी कडक सुरक्षा तैनात करण्यात आली आहे. ड्रोन प्रतिबंध, रडार व हवाई संरक्षणाचा समावेश असलेली बहुस्तरीय व्यवस्था सुरू झाली आहे.
श्रीनगर : पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर अमरनाथ यात्रा सुरू झाली आहे. यंदाच्या अमरनाथ यात्रेसाठी कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे.