New Delhi: उच्च न्यायालय! 'पीडित मुलीच्या आरोपांची दखल घ्या'; फक्त वैद्यकीय अहवालावर विसंबून राहू नका
Medical Reports Not Enough: न्यायमूर्ती गिरीश काठपालिया यांनी हा महत्त्वपूर्ण आदेश देताना २०१६ मध्ये घडलेल्या एका प्रकरणात आरोपी पुरुष आणि त्याच्या पत्नीविरुद्ध मारहाण आणि बेकायदेशीर अडवणूक प्रकरणातील आरोपांची पुन्हा एकदा चौकशी करण्याचे आदेश कनिष्ठ सत्र न्यायालयाला दिले.
नवी दिल्ली: ‘केवळ अल्पवयीन मुलीच्या वैद्यकीय तपासणी अहवालात दुखापतींचा उल्लेख नसल्यामुळे तिने केलेल्या थेट आरोपांना फेटाळून लावता येणार नाही,’ असे मत दिल्ली उच्च न्यायालयाने नोंदवले आहे.