WhatsApp, Facebookच्या प्रायव्हसी नियमांबाबत हायकोर्टात उद्या निकाल

सीसीआयच्या आदेशाविरोधात या कंपन्यांनी दिल्ली हायकोर्टात आव्हान दिलं होतं
facebook and whatsapp
facebook and whatsappSakal

नवी दिल्ली : WhatsApp आणि Facebook च्या नव्या गोपनियता नियमांबाबत भारतीय प्रतिस्पर्धी आयोगानं (CCI) दिलेल्या आदेशाला आव्हान देणाऱ्या याचिकेवर उद्या आपला निर्णय देणार आहे. WhatsApp आणि Facebook नं ही याचिका दाखल केली आहे. यापूर्वी २५ जुलै रोजी कोर्टानं याप्रकरणी आपला निर्णय राखून ठेवला होता. (High Court will pronounce decision tomorrow on new privacy rules of WhatsApp and Facebook)

सीसीआयनं गेल्यावर्षी या दोन्ही अॅपच्या नव्या गोपनियता अॅपच्या चौकशीचे आदेश दिले होते. हे आदेश देताना त्यांनी म्हटलं होतं की, या कंपन्यांनी प्रतिस्पर्धा अधिनियम २००० चं उल्लंघन केलं आहे. आयोगानं या दोन्ही सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना नोटीस पाठवली होती. या नोटिशीत म्हटलं होतं की, कंपन्यांची गोपनियता धोरण पारदर्शी नव्हते तसेच वापरकर्त्याच्या स्वैच्छिक सहमतीवर आधारित नव्हतं.

facebook and whatsapp
American Express बँकेवरील निर्बंध रिझर्व्ह बँकेने उठवले; 'हे' व्यवहार करता येणार

त्यामुळं आयोगानं या नव्या नियमांना आणि अटींना 'ठेवा अन्यथा सोडून द्या' असं संबोधत त्यात स्पष्टतेची कमतरता असल्याचं सांगत वापरकर्त्यांना त्याची स्पष्टता नसल्याचं म्हटलं होतं.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com