Cm Yogi Adityanath and PM Narendra Modi
sakal
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आणि भाजपचे फायरब्रँड नेते योगी आदित्यनाथ यांचा शनिवारचा दिल्ली दौरा राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह आणि भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांच्याशी झालेल्या या मॅरेथॉन बैठकींनंतर लखनऊपासून दिल्लीपर्यंत हालचालींना वेग आला आहे. आगामी २०२७ च्या विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून हे 'मिशन यूपी' अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहे.