

Major Defence Boost: Hi-Tech Radar Unit Planned in Chitrakoot
esakal
उत्तर प्रदेश आता केवळ धार्मिक आणि सांस्कृतिक केंद्र न राहता देशातील संरक्षणाचे (Defence) मोठे हब बनण्याच्या दिशेने वेगाने वाटचाल करत आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी लखनौमध्ये एका विशेष कार्यक्रमात भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड (BEL) कडे ७५ हेक्टर जमिनीचे वाटप पत्र सुपूर्द केले. या निर्णयामुळे बुंदेलखंडची ओळख आता 'डिफेन्स हब' म्हणून होणार आहे.