चेहरा झाकून कॉलेजमध्ये प्रवेश नाही; युपीमध्येही 'हिजाब'चे पडसाद

अलीगढच्या एका महाविद्यालयानं हिजाब बंदीसाठी नोटीस जारी केली आहे.
Karnataka Hijab Controversy
Karnataka Hijab Controversyesakal

Hijab Row : हिजाब प्रकरणाचे पडसाद आता देशभरात उटताना दिसत आहे. कर्नाटकच्या (Karnataka) काही शाळा आणि महाविद्यालयांत हिजाब परिधान करून येणाऱ्या विद्यार्थींनींना रोखण्यात आल्यानं निर्माण झालेल्या या वादाचे पडसाद आता देशभरात उमटताना दिसत आहेत. त्यातच आता उत्तर प्रदेशमध्ये (Uttar Pradesh) देखील या प्रकरणाचे पडसाद उमटताना दिसत आहेत. अलीगढच्या (Aligarh) एका महाविद्यालयात ठरलेल्या गणवेशाशिवाय इतर कुठल्याही गोष्टी परिधान करता येणार नाहीत, अशा सुचना विद्यार्थ्यांना दिल्या आहेत.

Karnataka Hijab Controversy
कर्नाटक सरकारचा मोठा निर्णय; शाळेत हिजाब, भगव्या शालीवर बंदी

कर्नाटकच्या डी.एस. महाविद्यालयाने घेतलेल्या निर्णयानुसार चेहरा झाकून येणाऱ्या कुणालाही महाविद्यालयात प्रवेश दिला जाणार नाही. महाविद्यालयाने म्हटलंय की, चेहरा झाकून येणाऱ्या विद्यार्थ्यांना कॅम्पसमध्ये प्रवेश करू देणार नाही. तसंच विद्यार्थ्यांना महाविद्यालयाच्या आवारात भगवी शाल किंवा हिजाब घालण्याची परवानगी नाही असं प्राचार्य डॉ. राज कुमार वर्मा म्हणाले.

Karnataka Hijab Controversy
लखीमपूर प्रकरण: आशिष मिश्राच्या जामिनाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान

दरम्यान, कर्नाटक अल्पसंख्याक विभागाने काल हिजाब प्रकरणाच्या पार्श्वभूमिवर एक एक मोठा निर्णय घेतला आहे. कर्नाटक अल्पसंख्याक कल्याण विभागाअतंर्गत येणाऱ्या सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांना वर्गात येताना भगवी शाल, स्कार्फ, हिजाब घालण्यास बंदी घातली आहे. पुढील आदेश येईपर्यंत विद्यार्थ्यांना या नियमाचं पालन करावं लागणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com