HP Election : 4 टर्म आमदार असलेल्या उमेदवाराऐवजी भाजपनं चहावाल्याला दिली उमेदवारी; सुरेश भारद्वाज नाराज | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

BJP Candidate Sanjay Sood

सूद हे सुरूवातीपासूनच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी निगडीत आहेत.

HP Election : 4 टर्म आमदार असलेल्या उमेदवाराऐवजी भाजपनं चहावाल्याला दिली उमेदवारी

HP Election : हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी (Himachal Pradesh Assembly Election) भाजपानं (BJP) कंबर कसलीय. नुकतेच भाजपानं 40 जणांच्या स्टार प्रचारकांची यादीही जाहीर केलीय. शिवाय, या निवडणुकीसाठी भाजपनं 68 उमेदवारांची यादी प्रसिद्ध केलीय. सगल दुसऱ्यांदा सरकार बनवण्याचं स्वप्न पाहणाऱ्या भाजपनं काही मतदारसंघात मातब्बर उमेदवारांऐवजी नव्या चेहऱ्यांना संधी दिलीय.

या नव्या चेहऱ्यांमध्ये एका चहावाल्याचाही समावेश आहे. हिमाचल प्रदेशची राजधानी असलेल्या सिमला शहर मतदारसंघातून (Shimla Constituency) सुरेश भारद्वाज (Suresh Bhardwaj) हे 4 वेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत. त्यांना सध्याच्या जयराम ठाकूर यांच्या मंत्रिमंडळातही स्थान देण्यात आलेलं आहे. मात्र, त्यांच्याजागी एका सामान्य चहावाल्याला उमेदवारी देण्यात आलीय. सुरेश भारद्वाज यांना सिमला शहर मतदारसंघाऐवजी कसुम्पटी मतदारसंघातून उमेदवारी दिलीय.

हेही वाचा: Sindhudurg : आता तुम्ही पुन्हा कसं निवडून येता, हे आम्ही बघतोच; दरेकरांचं 'या' दोन आमदारांना थेट चॅलेंज

उमेदवारी न मिळाल्यामुळं भारद्वाज नाराज

सिमला शहर मतदारसंघात भाजपनं संजय सूद (Sanjay Sood) यांना उमेदवारी दिली आहे. भाजपकडून उमेदवारी मिळाल्याने संजय सूद हे प्रचंड आनंदात आहेत. सूद यांचं कुटुंब अत्यंत गरीब असून 1991 पासून ते चहा विकण्याचं काम करतात. सुरुवातीला ते घरोघरी जाऊन पेपर वाटण्याचं काम करत होते, नंतर त्यांनी चहाविक्रीचा व्यवसाय सुरू केला होता. सूद हे सुरूवातीपासूनच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी (RSS) निगडीत असून त्यांना आर्थिक पातळीवर बराच संघर्ष करावा लागला आहे. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे काम करणाऱ्या सूद यांना कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नाहीये. सुरेश भारद्वाज यांना सिमला शहर मतदारसंघातून उमेदवारी न मिळाल्यामुळं ते काहीसे नाराज आहेत.

हेही वाचा: Pakistan : माजी पंतप्रधान इम्रान खान यांना निवडणूक आयोगाचा मोठा झटका; 5 वर्षांसाठी ठरवलं अपात्र