Himachal Pradesh Election: अन् केंद्रीय मंत्र्यांना अश्रू अनावर झाले... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Himachal Pradesh Election 2022

Himachal Pradesh Election: अन् केंद्रीय मंत्र्यांना अश्रू अनावर...

Anurag Thakur: हिमाचल प्रदेशमध्ये निवडणुकांची रणधुमाळी सुरु झालेली आहे. ऐनकेन प्रकारे मतदारांना आकर्षित करण्याचे विविध राजकीय पक्षांचे प्रयत्न सुरु आहेत. आज सुजानपूर येथील एका सभेत केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांना अश्रू अनावर झाले.

हिमाचल प्रदेशात ६८ विधानसभा मतदारसंघांसाठी ही निवडणूक पार पडणार आहे. यासाठी २५ ऑक्टोबर २०२२ हा उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस असेल. २७ ऑक्टोबरला अर्जांची छाननी होईल, तर २९ ऑक्टोबर हा अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे. त्यानंतर १२ नोव्हेंबर रोजी मतदान पार पडणार असून ८ डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे.

या निवडणुकीमध्ये भाजप तयारीने उतरला आहे. आज सुजानपूर येथे भाजप उमेदवार रणजीत सिंह यांच्यासाठी प्रचारसभेचं आयोजन करण्यात आलं होतं. या सभेसाठी केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांची उपस्थिती होती.

यावेळी बोलतांना अनुराग ठाकूर म्हणाले की, हमीरपूर या छोट्याश्या जिल्ह्याने माझ्या वडिलांना मुख्यमंत्री केलं आणि मला केंद्रीय मंत्री. मी ज्या खात्याचा मंत्री आहे त्या खात्याचा कारभार कधीकाळी माजी पंतप्रधान स्व. इंदिरा गांधी, चंद्रशेखर, लालकृष्ण अडवाणी यांच्यासह दिग्गज नेत्यांनी सांभाळलेला आहे. हे बोलतांना अनुराग ठाकूर भावूक झाले. त्यांना अश्रू आवरता आले नाहीत. लोकांनी कुटुंबाला दिलेल्या प्रेमामुळे त्यांनी आभार व्यक्त केले.