Himachal Pradesh Rain : हिमाचलमध्ये पावसाचा हाहाकार! गेल्या 24 तासांत 52 जणांचा मृत्यू, तर आठ राष्ट्रीय महामार्गांसह 621 रस्ते बंद

हिमाचल प्रदेशात दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे
Himachal Pradesh Rain
Himachal Pradesh RainEsakal

Himachal Pradesh Rain Updates : हिमाचल प्रदेशमध्ये पुन्हा एकदा पावसाने हाहाःकार माजवला आहे. हिमाचल प्रदेशात मुसळधार पावसाने हाहाकार माजवला आहे. सोमवारी, मुसळधार पावसासाठी रेड अलर्ट असताना राज्यात ढगफुटी आणि भूस्खलनामुळे 52 जणांचा मृत्यू झाला आहे. ढिगाऱ्याखाली दबल्यामुळे आणि वाहून गेल्याने सुमारे 30 जण बेपत्ता आहेत.

मंडी जिल्ह्यात 18, राजधानी शिमल्यात 14, सोलनमध्ये 11, कांगडा-हमीरपूरमध्ये 3-3, चंबा आणि सिरमौरमध्ये 1-1 लोकांचा मृत्यू झाला आहे. शिमला, सोलन, कांगडा येथे प्रत्येकी एका ठिकाणी आणि मंडीमध्ये दोन ठिकाणी ढगफुटी झाली. शिमल्यात 15, मंडीमध्ये 3, हमीरपूरमध्ये दोन आणि सिरमौरमध्ये एक जण बेपत्ता आहे. तर 16 ऑगस्टपर्यंत राज्यात अतिवृष्टीचा इशारा हवामान खात्याने जारी केला आहे.

Himachal Pradesh Rain
Himachal Pradesh Rain : हिमाचलमध्ये पावसाचा कहर; 50 जणांचा मृत्यू, 40 जण मलब्याखाली दबल्याचा अंदाज

आठ राष्ट्रीय महामार्गांसह 621 रस्ते बंद

त्याचबरोबर 15 ऑगस्ट रोजी स्वातंत्र्यदिनी होणारे सर्व सांस्कृतिक कार्यक्रम राज्य सरकारने रद्द केले आहेत. केवळ समारंभपूर्वक तिरंगा फडकवला जाईल. रविवारी रात्री राज्यात सरासरीपेक्षा 357 टक्के अधिक पाऊस झाला. राज्यातील आठ राष्ट्रीय महामार्ग आणि 621 रस्ते बंद करण्यात आले आहेत. मंडईतील पराशर रोडवर 250 पर्यटक अडकून पडले आहेत. त्यांना सुखरूप बाहेर काढणे हे आव्हान बनले आहे. सिमल्यातही पर्यटक हॉटेल्समध्ये अडकले आहेत.

Himachal Pradesh Rain
Cloudburst : हिमालयात वारंवार ढगफुटी का होते? ढगफुटी म्हणजे नेमकं काय?

मुसळधार पावसामुळे बचावकार्यात अडचणी येत आहेत. डोंगरावरून अजूनही दगड पडत आहेत. ढिगाऱ्यासह मंदिराच्या वरती चार ते पाच झाडे पडली. यापेक्षा जास्त नुकसान झाले आहे. एसडीआरएफ, आयटीबीपी, पोलीस आणि स्थानिक लोक बचावकार्य करत आहेत. जेसीबी मशिनने ढिगारा काढला जात आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com