हिमंत बिस्वा आसामचे नवे मुख्यमंत्री

हिमंत बिस्वा आसामचे नवे मुख्यमंत्री

गुवाहाटी : ईशान्य लोकशाही आघाडी(एनईडीए) चे निमंत्रक हिमंत बिस्वा सरमा (Himanta Biswa Sarma) यांनी सोमवारी आसामच्या मुख्यमंत्रिपदी शपथ घेतली. राज्यपाल जगदीश मुखी (Governor Jagdish Mukhi) यांनी त्यांना शपथ दिली. यावेळी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी नड्डा (BJP national president JP Nadda ) यांच्यासह आसाममधील इतर प्रमुख नेत्यांनी उपस्थिती दर्शवली होती. रविवारी आसाम भाजपच्या विधीमंडळ नेतेपदी हिमंता बिस्वा सरमा यांची निवड झाली होती. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजप नेतृत्वाखालील आघाडीने १२६ पैकी ७५ जागा मिळवित आसाममधील सत्ता कायम राखली. मात्र, पक्षाने राज्यात खांदेपालट करत सर्वानंद सोनोवाल यांच्याऐवजी हिमंता सरमांकडे मुख्यमंत्रीपद सोपविले आहे. (Himanta Biswa Sarma takes oath as the Chief Minister of Assam)

हिमंता बिस्वा यांच्या शपथविधी कार्यक्रमाला त्रिपुराचे मुख्यमत्री बिप्लब देब (CM of Tripura Biplab Deb), मेघालयाचे मुख्यमंत्री कॉनराड संगमा (Meghalaya CM Conrad Sangma), मणिपूरचे मुख्यमंत्री एन. बीरेन सिंह (Manipur CM N Biren Singh), आणि नागालँडचे मुख्यमंत्री नेफियू रियो (Nagaland CM Neiphiu Rio) शपथविधी कार्यक्रमाला उपस्थित होते. तसेच आसामचे माजी मुख्यमंत्री सर्बानन्द सोणोवाल (Former CM Sarbananda Sonowal) यांनाही उपस्थित दर्शवली.

हिमंत बिस्वा आसामचे नवे मुख्यमंत्री
चहा पिल्याने कोरोनाचा संसर्ग होत नाही?

धडाडीचे मंत्री अशी ओळख असणारे हिमंता बिस्वा सरमा आता सर्वानंद सोनोवाल यांची जागा घेतील. सध्या ईशान्येकडील सर्वाधिक प्रभावशाली नेत्यांमध्ये हिमंता बिस्वा यांची गणना होते. ईशान्य भारतातील भाजप नेतृत्वाखालील ईशान्य लोकशाही आघाडी (एनईडीए) चेही ते निमंत्रक आहेत.

आरोग्यमंत्री म्हणून ठसा -

आसामची राजधानी गुवाहाटीत १ फेब्रुवारी १९६९ मध्ये हिमंता बिस्वा सरमा यांचा जन्म झाला. गुवाहाटीतीलच कामरूप अकादमी प्रशालेत त्यांचे शालेय शिक्षण झाले. त्यानंतर, कॉटन महाविद्यालयातून त्यांनी पदवी घेतली. सरकारी विधी महाविद्यालयातून एलएलबी केल्यानंतर त्यांनी गुवाहाटी विद्यापीठातून पीएचडीही मिळविली.

हिमंत बिस्वा आसामचे नवे मुख्यमंत्री
Fact Check : नाकात लिंबाचा रस टाकल्यास कोरोना जातो?

हिमंता बिस्वा यांची राजकीय कामगिरी -

सोनोवाल यांच्या मंत्रिमंडळात आरोग्यमंत्री म्हणून काम करतानाही सरमा यांनी कोरोनाची साथ रोखण्यासाठी केलेल्या कामातून आपला ठसा उमटविला. त्याचप्रमाणे, त्यांनी गृहमंत्रीपद वगळता अर्थ, सार्वजनिक बांधकाम या खात्यांचा कार्यभारही सांभाळला. चारवेळा मंत्री राहिलेल्या सरमा यांनी २००१ मध्ये जालूकबारी मतदारसंघातून विजयी होत विधानसभेत पहिल्यांदा प्रवेश केला. जालूकबारीमधून त्यानंतरच्या निवडणुकाही सरमा यांनी मोठ्या फरकाने जिंकल्या. त्यांनी २०१५ मध्ये तत्कालिन मुख्यमंत्री तरुण गोगोई यांच्या काँग्रेस नेतृत्वाखालील सरकारला रामराम करत भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांचा हे पक्षांतर भाजपच्या चांगलेच पथ्यावर पडले. ईशान्येत सत्तेचा पाया रोवण्याचा मार्गच सरमांमुळे भाजपला मिळाला. त्यामुळे, सरमा ईशान्य भारतात भाजपच्या सत्तेचे शिल्पकार म्हणूनही ओळखले जातात.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com