Historical Temple : वृंदावनमधील रहस्यमयी जागेत दडलंय पागल बाबा मंदिर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Historical Temple

Historical Temple : वृंदावनमधील रहस्यमयी जागेत दडलंय पागल बाबा मंदिर

Historical Temple : वृंदावन हि भगवान श्री कृष्णांच्या स्पर्शाने पावन झालेली नगरी आहे. हे नंदलाला श्रीकृष्णाचे जन्मस्थान आहे. या वृंदावनात अनेक मंदिरे आहेत. या नगरीत तुम्हाला कन्हैयाची अनेक छोटी-मोठी मंदिरे दिसतील. परंतु येथे एक असे मंदिर आहे. जे पागल बाबा मंदिर म्हणून ओळखले जाते. हे मंदिर श्रीकृष्णाच्या एका भक्ताने बांधले होते, ज्यांना पागल बाबा या नावाने ओळखले जाते. आज या मंदिराबद्दल काही आश्चर्यचकीत करणाऱ्या गोष्टी जाणून घेऊयात.

हेही वाचा: Swami Narayan Temple : सुटीचे औचित्य साधत स्वामी नारायणाच्या दर्शनास लोटली गर्दी!

वृंदावनात असलेल्या अनेत मंदिरांपैकी पागल बाबा मंदिर जरा वेगळे आहे. या मंदिराविषयी अनेक कथा जोडल्या गेल्या आहेत. त्यापैकी एक कथा आपण पाहूयात. श्रीकृष्णाच्या काळात या मंदिरात एक ब्राह्मण होता. त्याने एका सावकाराकडून पैसे घेतले होते. त्या बदल्यात तो त्या सावकाराला दर महिन्याला कर्जाचा हफ्ता आणि व्याज देत असे.

हेही वाचा: Kapaleshwar Temple Restoration : श्री कपालेश्‍वर मंदिर जिर्णोद्धार कामास वेग

त्यावेळी कर्जाचा शेवटता हफ्ता फेडण्याच्यावेळी त्या सावकाराने तूम्ही पैसे फेडले नाहीत, असे ढोंग केले. त्यावरून तो ब्राह्मणावर वाट्टेल ते आरोप करू लागला. एवढेच काय तर त्या ब्राह्मणाविरूद्ध सावकाराने कोर्टात केसही दाखल केली.

त्या ख़टल्यादरम्यान न्यायाधीशांनी त्या वृद्ध ब्राह्मणाला विचारले की, आपण सावकाराला पैसे दिल्याचा पुरावा आपल्याकडे आहे का, तेव्हा त्याने साक्षात भगवान कृष्णच माझ्यासाठी या न्यायालयात येऊन खरे खोटे सांगतील असे सांगितले.

हेही वाचा: Temple Parikrama: मंदिरात कोणत्या देवासाठी किती प्रदक्षिणा घालाव्या? जाणून घ्या योग्य पद्धत

त्या खटल्याच्या पुढील तारखेला एक वृद्ध व्यक्ती न्यायालयात आला आणि त्याने सर्व कर्जाची परतफेड केल्याची तारखांसहीत माहिती न्यायालयाला दिली. त्या व्यक्तीच्या सांगण्यावरून सावकाराचे रजिस्टर तपासले असता ते बरोबर असल्याचे सिद्ध झाले.

हेही वाचा: Temples : बुलेट बाबाची होते मनोभावे पूजा, काही ठिकाणी फिरतात हजारो उंदरं, देशातील अनोखी मंदिरं

पागल बाबा मंदिर कोणी बांधले आहे?

या घटनेनंतर न्यायाधीशांनी त्या ब्राह्मणाला विचारले की, हा म्हातारा कोण होता आणि तो कुठे राहतो? तर ब्राह्मण म्हणाले की हे साक्षात कृष्ण भगवान होते आणि ते जगभरात सर्वत्र आसतात. यावर न्यायाधीशांनी आपल्या कामाचा राजीनामा दिला आणि साधूच्या रूपात कृष्णाच्या शोधात निघाले. त्यानंतर लोक त्यांना पागल बाबा म्हणू लागले. आणि ते न्यायाधीश याच नावाने प्रसिद्ध झाले.

हेही वाचा: Kolhapur Mahalaxmi Temple : नवरात्रीच्या शेवटच्या माळेला श्री महालक्ष्मीचे रूप पाहिलंत का?

1969 मध्ये पागल बाबांनी मंदिराचे बांधकाम करण्याचे निश्चित केले. आणि मथुरा नगरीकडे जाणाऱ्या रस्त्यावर नऊ मजली संगमरवरी लीलाधाम मंदिर बांधले. जे पागल बाबा मंदिर म्हणून ओळखले जाते. हे मंदिर 18000 स्क्वेअर फूटमध्ये बांधले असून ते 221 फूट उंच आहे. या मंदिराच्या प्रत्येक मजल्यावर देवाची मूर्ती स्थापित आहे. 24 जुलै 1980 रोजी पागल बाबांनी देहत्याग करून समाधी घेतली. तुम्ही मंदिरात बाबांची मूर्ती पाहू शकता.

हेही वाचा: Kolhapur Mahalaxmi Temple Navratri Day 4 Pooja : आई अंबाबाईचं नवरात्रीच्या चौथ्या माळेचं रुप पाहिलंत?

मंदिराची देखभाल कोण करते

जिल्हा न्यायाधीश आणि जिल्हा दंडाधिकारी हे या मंदिराचे मुख्य विश्वस्त आहेत. मथुराचे जिल्हा न्यायाधीश आणि जिल्हा दंडाधिकारी हे या मंदिराचे मुख्य विश्वस्त आहेत. पागल बाबा मंदिरातील मुख्य देवता श्री कृष्ण आणि श्री राम आहेत. हे मंदिर सकाळी 8 ते रात्री 8 या वेळेत भाविकांसाठी खुले असते.