

उत्तर प्रदेशातील मोदीनगर येथील ५८ वर्षांची परंपरा लाभलेली 'जैन शिकंजी' आपल्या खास घरगुती मसाल्यामुळे जगभरातील पर्यटकांच्या पसंतीस उतरली आहे.
Sakal
उत्तर प्रदेश : उत्तर प्रदेश हे केवळ तिथल्या ऐतिहासिक वास्तू किंवा राजकारणासाठीच नाही, तर तिथल्या खाद्यसंस्कृतीसाठीही जगप्रसिद्ध आहे. उन्हाळा असो वा हिवाळा, गाझियाबादमधील एका छोट्याशा शहरात मिळणारी 'शिकंजी' पिण्यासाठी लोक शेकडो किलोमीटरचा प्रवास करून येतात.
उन्हाचा कडाका वाढत आहे, तेव्हा गाझियाबाद जिल्ह्यातील मोदीनगर मधील 'जैन शिकंजी' पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. ही शिकंजी एवढी खास का आहे, याची ही काही रंजक कारणे: