Truck Drivers Strike : संपामुळे इंधन पुरवठा विस्कळीत; देशभरातील पेट्रोल पंपांवर लांबलचक रांगा, जीवनावश्यक वस्तूही महागल्या

ट्रक वाहतूकदारांच्या संपाचे (Truck Drivers Strike) देशातील दहा राज्यांत तीव्र पडसाद उमटले.
Hit and Run Law, Truck Drivers Strike Petrol Pump
Hit and Run Law, Truck Drivers Strike Petrol Pumpesakal
Summary

राज्यातील चार हजार पेट्रोल पंपांना या आंदोलनाचा फटका बसला आहे. मध्यप्रदेशात देखील अनेक पेट्रोल पंपांवर वाहनांच्या रांगा लागल्याचे चित्र पाहायला मिळाले.

नवी दिल्ली : ट्रक वाहतूकदारांच्या संपाचे (Truck Drivers Strike) देशातील दहा राज्यांत तीव्र पडसाद उमटले. अनेक ठिकाणांवर इंधनाप्रमाणेच जीवनावश्यक वस्तूंची देखील टंचाई निर्माण झाली होती. मध्यप्रदेश, राजस्थानसह अनेक राज्यांतील पेट्रोल पंप (Petrol pump) हे रिकामे झाल्याने इंधन खरेदीसाठी पेट्रोलपंपांवर लोकांच्या रांगा लागल्याचे चित्र पाहायला मिळाले.

इंधन टंचाईमुळे फळे, दूध आणि भाजीपाल्याचे दर गगनाला भिडले आहेत. या संपाच्या अनुषंगाने सर्वोच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल करण्यात आली होती त्यावर लवकरच सुनावणी होऊ शकते. ‘ऑल इंडिया ट्रान्सपोर्ट काँग्रेस’चे अध्यक्ष अमृतलाल मदान यांनी हे आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा दिल्यानंतर सरकारी पातळीवर हालचालींना वेग आला होता, शेवटी रात्री सरकारने कायदेशीरबाबत माघार घेतल्यानंतर हा संप माघारी घेण्यात आला.

Hit and Run Law, Truck Drivers Strike Petrol Pump
Bangladesh Election 2024 : बांगलादेशच्या राजकारणात शेख हसीना यांचं वर्चस्व अबाधित!

या संपाला आक्षेप घेणाऱ्या दोन याचिकांवर मध्यप्रदेश उच्च न्यायालयात आज सुनावणी पार पडली. यावर न्यायालयाने राज्य सरकारलाच धारेवर धरताना हा संप तातडीने संपुष्टात आणून वाहतूक पूर्ववत करा, अशा सूचना केल्या आहेत. हरियानात ट्रक चालकांच्या या संपामध्ये खासगी रिक्षा चालकही सहभागी झाले होते.

Hit and Run Law, Truck Drivers Strike Petrol Pump
Indian Navy : नौदलाच्या 8 माजी अधिकाऱ्यांची फाशी रद्द; कतारमध्ये भारताच्या मुत्सद्देगिरीला मोठं यश

राज्यातील चार हजार पेट्रोल पंपांना या आंदोलनाचा फटका बसला आहे. मध्यप्रदेशात देखील अनेक पेट्रोल पंपांवर वाहनांच्या रांगा लागल्याचे चित्र पाहायला मिळाले. काही ठिकाणी बाचाबाचीचे प्रकारही घडत असल्याने पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

दिवसभरात

  • ‘यूपी’तील मैनपुरीत पोलिस व आंदोलकांत चकमक

  • जम्मू- काश्मीरमध्ये ९० टक्के पेट्रोल पंप कोरडे

  • राजस्थानातील अजमेरमध्ये गाड्यांची जाळपोळ

  • तेलंगणमध्ये पेट्रोल पंपांवर गर्दी आवरण्यासाठी पोलिस

  • उत्तरप्रदेशात ठिकठिकाणी ट्रक चालकांचे आंदोलन

  • बिहारमध्ये अनेक भागांत पेट्रोलपंप बंद, वाहतूक ठप्प

  • हरियानामध्ये केवळ आठवडाभराचे इंधन शिल्लक

  • पंजाबमध्येही तीस टक्के पेट्रोलपंप कोरडेठाक

  • अनेक भागांत इंधन विक्रीवर मर्यादा

  • मध्यप्रदेशात जीवनावश्यक वस्तूंच्या वाहतुकीस फटका

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com