

Holi 2026
sakal
रंगांच्या उत्सवात अख्खा देश न्हाऊन निघाला असताना, उत्तर प्रदेशातील रायबरेली जिल्ह्यातील डलमऊ हे ऐतिहासिक शहर मात्र शांत आहे. जिथे घराघरांत आनंदाचे वातावरण असायला हवे, तिथे ६०० वर्षांपासून होळीच्या दिवशी शोक पाळला जातो. या परंपरेमागे शौर्य, बलिदान आणि एका फंदफितुरीचा थरारक इतिहास दडलेला आहे.