Holi 2026: कपडाफाड होळी! ९० च्या दशकातील 'त्या' गाण्यावर ३ दिवस नाचतं अख्खं गाव; ऑक्सिजन सिलेंडरमधून उडणार गुलाल
Kapda Fad Holi 2026 in Prayagraj: प्रयागराजमधील ९० च्या दशकातील 'नाकाबंदी' गाण्यावर कपडाफाड होळीचा तीन दिवसांचा उत्सव. ऑक्सिजन सिलेंडरमधून रंग उडवला जाईल, ५० हजारांहून अधिक लोक सहभागी होतील. घरांच्या छतावरून रंगाचा वर्षाव अनुभवता येईल.
भारताच्या सांस्कृतिक नकाशावर प्रयागराजची होळी ही सर्वात हटके आणि जोशपूर्ण मानली जाते. इथल्या 'लोकनाथ' गल्लीतून सुरू होणारी होळीची परंपरा केवळ रंगांपुरती मर्यादित नाही, तर ती एक वेगळ्याच संस्कृतीचा भाग बनली आहे.