Holi Festival : या गावातील लोक पेटलेली शेणी तरुणांवर फेकून का मारतात ?

माडीवर शेण्या फेकून मारल्या की त्या आपटून आगीच्या ठिणग्या उडतात. या ठिणग्या अंगावर पडल्या असता तो देवाचा प्रसाद समजला जातो.
Holi Festival
Holi Festivalgoogle

मुंबई : केपे पासून सहा किलोमीटर अंतरावर असलेल्या मळकर्णे गावात एक वेगळ्याच प्रकारची होळी साजरी केली जाते. गावातील काही तरूण होळीच्या रात्री मल्लिकार्जुनाच्या देवळासमोर एकत्र येतात.

यावेळी होळीची माडी (फोफळीचे कांड) वाजत-गाजत आणलेली असते. देवळासमोरील मांडावर ती उभी केली जाते आणि तिथूनच होळीला सुरुवात होते. (unique Holi is celebrated in Molcarnem village)

या होळीच्या माडीवर गावातील तरूण चढतात. खाली असलेले लोक पेटलेली शेणी त्या तरुणांवर फेकून मारतात. ही वेगळ्या प्रकारची होळी पाहाण्यासाठी शेकडोंची गर्दी जमलेली असते.

शेणी म्हणजे शेणाची सुकी गोवरी. गाई-म्हैशींचे शेण एकत्र करून त्याचे गोळे थापले जातात. ते उन्हात सुकवले जातात. याला शेणी म्हणतात. ही पेटलेली शेणी अंगावर फेकली की गावावरील संकट दूर होते, रोगराई टळते असा समज गावकऱ्यांमध्ये आहे. (holi festival in malkarne village goa )

या उत्सवात सहभागी होण्यासाठी ७ दिवस व्रत करावे लागते. त्यानंतरच सहभागी होता येते. यावेळी मांडावर काही भाविक आंब्याचे ताळे घेऊन नाचतात. यावेळी पारंपरिक वाद्ये वाजवली जातात.

माडीवर शेण्या फेकून मारल्या की त्या आपटून आगीच्या ठिणग्या उडतात. या ठिणग्या अंगावर पडल्या असता तो देवाचा प्रसाद समजला जातो.

मळकर्णे गावातील या होळीला शेकडो वर्षांची परंपरा आहे. दूरवर राहाणारे मळकर्णेचे नागरिकसुद्धा यात भाग घेण्यासाठी आवर्जून गावात येत असतात. पेटलेल्या होळीसमोर नारळ फोडून सर्व गावाचे कल्याण होवो आणि रक्षण होवो असे गाऱ्हाणे घातले जाते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com