Amit Shah : दिल्लीतील कायदा सुव्यवस्थेवर गृहमंत्र्यांची बैठक
Law And Order : दिल्लीतील कायदा आणि सुव्यवस्थेच्या मुद्द्यावर अमित शहा आणि मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. महिलांच्या सुरक्षेवर लवकरच विशेष धोरण जाहीर होणार आहे.
नवी दिल्ली : दिल्लीतील कायदा सुव्यवस्थेच्या मुद्द्यावर केंद्र आणि राज्य सरकारमध्ये ताळमेळ राखण्यासाठीची महत्त्वाची बैठक आज झाली. याबाबत गृहमंत्री अमित शहा यांनी आज मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यासमवेत बैठक घेऊन चर्चा केली.