लॉकडाउन जैसे थे; अनलॉक 5 चे नियम 30 नोव्हेंबरपर्यंत कायम

unlock 5
unlock 5

नवी दिल्ली - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेलं लॉकडाऊन हळू हळू शिथिल केलं जात आहे. दरम्यान, आता केंद्रीय गृहमंत्रालयाने 30 सप्टेंबरला लॉकडाउनच्या अटी शिथिल करण्याबाबत जी नियमावली जाहीर केली होती ती पुढे 30 नोव्हेंबरपर्यंत लागू राहणार असल्याचे सांगितले आहे. कंटेनमेंट झोनमध्ये लॉकडाउनच्या नियमांची अंमलबजावणी कडक केली जाईल असे आदेश केंद्राने दिले आहेत.

राज्यांतर्गत व्यक्ती किंवा मालवाहतूक करण्यास कोणतीही बंधने नाहीत. त्यासाठी कोणत्याही प्रकारची परवानगी किंवा इ परमिट घेण्याची गरज नसल्याचं केंद्रीय गृह मंत्रालयाने म्हटलं आहे.

गेल्या महिन्यात 30 सप्टेंबरला लॉकडाऊन 5 ची नियमावली प्रसिद्ध करण्यात आली होती. यामध्ये अनलॉक पाचमध्ये 15 ऑक्टोबरपासून देशात सिनेमागृहे, थिएटर उघडता येतील असं म्हटलं होतं. तसंच कंपन्यांकडून आयोजित करण्यात येणाऱ्या कार्यक्रमांना परवानगी देण्यात आली होती. त्यासाठी सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन बंधनकारक करण्यता आले होते . 

शाळांबाबतचा निर्णय अद्यापही झालेला नाही. तसंच पार्कसह पर्यटन स्थळेही सुरु करण्यास परवानगी देण्यात येईल असं ऑक्टोबर महिन्यात शिथिल करण्यात आलेल्या नियमांमध्ये म्हटलं होतं. सामाजिक, शैक्षणिक, खेळ, मनोरंजन, सांस्कृतिक, धार्मिक कार्यक्रमांसाठी 100 लोकांना उपस्थित राहण्यास परवानगी देण्यात आली होती. मात्र कंटेनमेंट झोनमध्ये कडक लॉकडाउन कायम ठेवला होता. 

राज्याबाहेर प्रवासावर बंधनं हटवण्यात आली होती. मात्र गृहमंत्रालयाने आंतरराष्ट्रीय उड्डाणांवर बंदी कायम ठेवली होती. याशिवाय 10 वर्षांपेक्षा कमी वयाची मुले, गर्भवती महिला, आजारी लोक आणि वयोवृद्धांना घरातच राहण्याचं आवाहन केलं होतं. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com