हनी ट्रॅपमध्ये अडकून पाकिस्तानला पाठवली गोपनीय माहिती; जवानाला अटक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Akola Crime News Womens Honey Trap to Trap Eminent Men

हनी ट्रॅपमध्ये अडकून पाकिस्तानला पाठवली गोपनीय माहिती; जवानाला अटक

पाटना : बिहार राज्यातील दानापूरमधील सैन्याच्या एका अधिकाऱ्याला अटक करण्यात आली आहे. त्याच्या अटकेचं कारण मोठं धक्कादायक आहे. पाकिस्तानमधील एका व्यक्तीला संवेदनशील माहिती आणि कागदपत्रे या अधिकाऱ्याकडून पाठवण्यात येत होती. तशी कबूली देखील या अधिकाऱ्याने दिली आहे. याबाबत माहिती देताना एएसपी सैयद इम्रान मसूद यांनी म्हटलंय की, या अधिकाऱ्याने आपल्या सैन्याच्या युनिटमधील संवेदनशील डॉक्यूमेंट्स पाकिस्तानमधील एका व्यक्तीला पाठवत असल्याची कबूली दिली आहे. कार्यालयीन गोपनीयतेच्या कायद्याचं हे उल्लंघन असून त्याअंतर्गत FIR दाखल करण्यात आली आहे. याबाबतचा अधिक तपास सध्या सुरु आहे.

हेही वाचा: लखीमपूर: SITवर न्यायालयाची नाराजी; निवृत्त न्यायाधीशाच्या देखरेखीखाली होणार तपास

न्यूज एजन्सी IANS ने दिलेल्या माहितीनुसार, बिहार दहशतवाद विरोधी पथकाने एका पाकिस्तानी व्यक्तीला गोपनीय माहिती लीक करण्याच्या आरोपाखाली एका अधिकाऱ्याला अटक केली आहे. या आरोपीचं नाव जनार्दन प्रसाद सिंह असल्याचं म्हटलं आहे. इंटेलिजन्स ब्यूरोद्वारे मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारावर ही अटक करण्यात आली आहे.

हेही वाचा: उच्च शिक्षणासाठी भारतीय विद्यार्थ्यांची अमेरिकेलाच पसंती

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या आरोपीने आपला गुन्हा कबूल केला असून त्याने एका पाकिस्तानी महिलेशी बातचित करताना दानापूर छावनीशी संबंधित काही माहिती शेअर केली आहे. बिहार एटीएसने म्हटलंय की, नालंदा जिल्ह्यात राहणारा आणि दानापूर छावनीमध्ये तैनात असणारा हा अधिकारी एका पाकिस्तानी महिलेच्या हनीट्रॅपमध्ये फसला होता.

अधिकाऱ्यांनी म्हटलंय की, कदाचित या पाकिस्तानी महिलेने देशातील सैन्याबाबतची गोपनीय माहिती शेअर करण्यासाठी ब्लॅकमेल केलं होतं. या आरोपीने त्या महिलेसोबत काही गोपनीय दस्ताऐवज देखील शेअर केले आहेत.

loading image
go to top