काश्‍मिरी नेत्यांसाठी आम्ही पुरवितो हॉलिवूडच्या सीडी : जितेंद्रसिंह

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 22 September 2019

काश्‍मीर खोऱ्यातील नेत्यांना नजरकैदेत ठेवण्यात आले नसून ते आमच्यासाठी पाहुणे आहेत, या सर्वांना सध्या अतिथिगृहामध्ये ठेवण्यात आले असून, त्यांना तेथे मनोरंजनासाठी हॉलिवूडमधील चित्रपटांच्या सीडीदेखील पुरविल्या जात असल्याचे केंद्रीय मंत्री जितेंद्रसिंह यांनी सांगितले आहे.

नवी दिल्ली : काश्‍मीर खोऱ्यातील नेत्यांना नजरकैदेत ठेवण्यात आले नसून ते आमच्यासाठी पाहुणे आहेत, या सर्वांना सध्या अतिथिगृहामध्ये ठेवण्यात आले असून, त्यांना तेथे मनोरंजनासाठी हॉलिवूडमधील चित्रपटांच्या सीडीदेखील पुरविल्या जात असल्याचे केंद्रीय मंत्री जितेंद्रसिंह यांनी सांगितले आहे.

काश्मिरी नेत्यांना अठरा महिन्यांपेक्षा अधिककाळ नजरकैदेत ठेवले जाणार नसल्याचेही जितेंद्र सिंह यांनी यावेळी स्पष्ट केले आहे. पाकव्याप्त काश्‍मीरदेखील आमचाच भाग असून येथे जुनी सीमारेषा पुन्हा बहाल केली जावी म्हणून आमचे प्रयत्न सुरू असल्याचेही जितेंद्र सिंह यांनी यावेळी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: House arrest of Kashmiri leaders not beyond 18 months, they have movies, gym says Jitendra Singh