Video : उत्तराखंडमध्ये पुरात घर गेले वाहून

वृत्तसंस्था
Monday, 12 August 2019

उत्तराखंडमध्ये सध्या पावसाचा कहर सुरु असून, अनेक नद्या दुथडी भरून वाहत आहेत. चामोली जिल्ह्यात पुराच्या पाण्यात घर कोसळल्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

डेहराडून - उत्तराखंडमध्ये सध्या पावसाचा कहर सुरु असून, अनेक नद्या दुथडी भरून वाहत आहेत. चामोली जिल्ह्यात पुराच्या पाण्यात घर कोसळल्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

देशभरात मुसळधार पाऊस पडत असून, अनेक राज्यांमध्ये पुरस्थिती आहे. उत्तरेकडील राज्यांमध्येही अनेक नद्यांना पूर आला आहे. उत्तराखंडमध्येही पुरामुळे अनेक नागरिकांचे स्थलांतर करण्यात आले आहे.

उत्तराखंडमधील चामोली जिल्ह्यातील लांखी गावातील विकासखंड घाट येथे पाण्याच्या प्रवाहात एक घर वाहून गेले आहे. हे घर कोसळत असतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या दुर्घटनेची माहिती मिळताच आपत्तीव्यवस्थापनाचे जवान घटनास्थळी दाखल झाले असून, बचावकार्य सुरु आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: House collapses as flash flood hits in Uttarakhand Chamoli