Citizenship: पाच वर्षात 8 लाख लोकांनी सोडलं भारतीय नागरिकत्व; चीन-पाकिस्तानलाही बनवताहेत घर

modi
modi esakal

नवी दिल्ली- २०२० वर्ष सरले नसतानाच आतापर्यंत ८७ हजारांपेक्षा अधिल लोकांनी भारतीय नागरिकत्व सोडलं आहे. गेल्या पाच वर्षातील आकडेवारी तर चिंता वाढवणारी आहे. गेल्या पाच वर्षात आठ लाखांपेक्षा जास्त लोकांनी भारतीय नागरिकत्व सोडलं असून ते इतर देशाचे नागरिक झाले आहेत. सरकारच्या दाव्यानुसार, वैयक्तिक कारणासाठी या लोकांनी भारतीय नागरिकत्व सोडण्याचा निर्णय घेतलाय.इतक्या मोठ्या प्रमाणात लोक देश का सोडत आहेत आणि ते कोणत्या देशाला पसंती देत आहेत हा महत्वाचा प्रश्न आहे. (how many Indians left citizenship in 2023 choosing these country as home)

modi
NCP Crisis : अजित पवारांसोबत गेलेले लोक दु:खी, आमच्याकडून जे झालं ते चुकीचं झालं असं सांगताहेत; शरद पवारांचा गौप्यस्फोट

गेल्या पाच वर्षात किती भारतीयांनी नागरिकत्व सोडले आणि ते कोणत्या देशाचे नागरिक झाले अशी माहिती राज्यसभेत खासदार संदीप कुमार पाठक यांनी विचारली होती. किती उद्योगपतींनी देश सोडला आहे. तसेच लोक का देश सोडत आहेत याबाबत सरकारने काही अभ्यास केलाय का? देश सोडणाऱ्या लोकांचा व्यवसाय कोणता आहे? असे प्रश्व पाठक यांनी संसदेत विचारले होते.

सरकारकडून राज्यमंत्री मुरलीधरन यांनी याबाबत माहिती दिली. जून २०२३ पर्यंत सहा महिन्यांच्या काळात ८७ हजार २६ लोकांनी नागरिकत्व सोडलं आहे. २०१८ मध्ये एक लाख ३४ हजार ५६१, २०१९ मध्ये १ लाख ४४ हजार १७, २०२० मध्ये ८५ हजार २५६, २०२१ मध्ये १ लाख ६३ हजार ३७० आणि २०२२ मध्ये २ लाख २५ हजार ६२० लोकांनी भारतीय नागरिकत्व सोडलं आहे.

modi
Manipur Violence: मणिपूर विषयावर पंतप्रधान मोदींची भूमिका देशासाठी चिंतेची; शरद पवारांचे मत

नागरिकत्व का सोडत आहेत लोक?

मीडिया रिपोर्टनुसार, लोक भारतीय नागरिकत्व सोडण्याचे विविध कारणं आहेत. करियर, जीवनाचा गुणात्मक स्तर, शिक्षणाच्या संधी, चांगले आरोग्य, स्वच्छ हवा अशा अनेक कारणांसाठी लोक देश सोडताहेत. इतर देशांप्रमाणे भारत दुहेरी नागरिकत्वाला परवानगी देत नाही. त्यामुळे इतर देशाचे नागरिकत्व घेणाऱ्या लोकांना भारताचे नागरिकत्व आपसूक सोडावे लागते.

कुठं जात आहेत लोक?

भारत सोडल्यानंतर लोकांची पहिली पसंद अमेरिका देश आहे. त्यानंतर कॅनडा, ऑस्ट्रेलिया, ब्रिटेन, इटली, न्यूझीलँड, जर्मनी, सिंगापूर, नैदरलँड आणि स्वीडन या देशांना भारतीयांची पसंदी मिळाली आहे. विशेष म्हणजे काही लोकांनी चीन या देशालाही पसंदी दिली आहे. गेल्या पाच वर्षात २ हजार ४४२ लोकांनी चीनचे नागरिकत्व स्वीकारलं आहे. २०२० नंतर काहींनी पाकिस्तानचे नागरिकत्व घेतलं आहे. २०२० मध्ये ७, २०२१ मध्ये ४१, २०२० मध्ये १३ आणि जून २०२३ मध्ये ८ लोकांनी पाकिस्तानचे नागरिकत्व घेतले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com