श्रमिक गाड्यांत किती लोकांचा मृत्यू झाला? रेल्वेमंत्र्यांनी दिली राज्यसभेत माहिती

Piyush_Goyal_h03.jpg
Piyush_Goyal_h03.jpg

नवी दिल्ली-  कोरोना लॉकडाउनच्या काळात स्थलांतरित मजुरांसाठी सोडण्यात आलेल्या श्रमिक विशेष रेल्वेगाड्यांतून जाणाऱ्या ९७ कष्टकऱ्यांचा प्रवासादरम्यान मृत्यू झाला, अशी माहिती रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी आज राज्यसभेत दिली. तृणमूल कॉंग्रेसचे डेरेक ओब्रायन यांनी विचारलेल्या लेखी प्रश्‍नाच्या उत्तरात गोयल यांनी ही माहिती दिली.

लॉकडाउनच्या काळात आपापल्या गावांकडे पायी निघालेल्या हजारो मजुरांचा रस्त्यातच घरी पोचण्याआधी मृत्यू झाला असे कॉंग्रेस, बसप व विरोधी पक्षांचे म्हणणे आहे. विरोधकांना उत्तर देताना गोयल म्हणाले की, ‘‘ लॉकडाउन व अनलॉकमध्ये ( १ मे ते ३१ ऑगस्ट) देशभरात ४ हजार ६२१ विशेष श्रमिक रेल्वेगाड्या सोडण्यात आल्या होत्या, त्यातून ६ कोटी ३१ लाख ९ हजार स्थलांतरित मजुरांना त्यांच्या राज्यांत सोडण्यात आले. राज्य पोलिसांनी ९ सप्टेंबरपर्यंत जमविलेल्या आकडेवारीनुसार यापैकी ९७ स्थलांतरित मजुरांचा प्रवासादरम्यान मृत्यू झाला. यातील ८७ मृतांचे शवविच्छेदन करण्यात आले. त्यापैकी ५१ अहवाल केंद्राकडे मिळाले आहेत. त्यानुसार ह्रदयविकाराचा झटका येणे, ब्रेन हॅमरेज, यकृताचे विकार ही त्यांच्या मृत्यूची काही कारणे असल्याचे राज्यांच्या पोलिसांनी कळविले आहे.’’

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com