अबू सालेमची शिक्षा कायम राहणार की वाढणार? ११ जुलैला फैसला

अबू सालेम सध्या भारताच्या ताब्यात असून पोर्तुगालमधून त्याचं प्रत्यार्पण करण्यात आलं आहे.
Abu Salem
Abu Salem

नवी दिल्ली : मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी आणि कुख्यात गँगस्टर अबू सालेम याच्या अंतिम शिक्षेवर येत्या ११ जुलै रोजी सुप्रीम कोर्ट निकाल देणार आहे. आपल्या शिक्षेबाबत त्यानं सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती. सालेम सध्या भारताच्या ताब्यात असून पोर्तुगालमधून त्याचं प्रत्यार्पण करण्यात आलं आहे. (How many years will gangster Abu Salem be sentenced Supreme Court will give its verdict on July 11)

अबू सालेमनं याचिकेद्वारे मुद्दा उपस्थित केला होता की, भारत-पोर्तुगालमधील प्रत्यार्पण कायद्यानुसार आरोपीच्या तुरुंगावासाच्या शिक्षेचा कालावधी २५ वर्षांपेक्षा अधिक होऊ शकत नाही. या याचिकेवर सुप्रीम कोर्ट ११ जुलै रोजी निर्णय देणार आहे. त्यावर सालेमला अखेर किती वर्षांचा तुरुंगवास होईल हे ठरेल.

Abu Salem
CM शिंदेंच्या हस्तेच होणार आषाढीची महापूजा, ECची सशर्त परवानगी

दरम्यान, सालेमच्यावतीनं सुप्रीम कोर्टात २ फेब्रुवारी रोजी याचिका दाखल करण्यात आली होती. यावर कोर्टानं केंद्राकडून उत्तर मागवलं होतं. त्यावर २० एप्रिल रोजी केंद्राकडून उत्तर सादर करताना गृह सचिव अजय भल्ला यांनी म्हटलं होतं की, पोर्तुगाल सरकारला सालेमच्या प्रत्यार्पणावेळी भारत सरकारनं दिलेल्या आश्वासनाचं पालन करण्याबाबत सालेमच्या याचिकेनुसार वर्तमान स्थितीत कार्यवाहीबाबत कोणतेही निर्देश दिले जाऊ शकत नाहीत. पोर्तुगालला दिलेल्या आश्वासनाशी भारतातील कोर्ट बांधील नाहीत. ते कायद्याप्रमाणं आपला निर्णय देऊ शकतात. भल्ला यांनी असंही म्हटलं होतं की, सालेमचं प्रत्यार्पण २००५ मध्ये झालं होतं. त्याच्या सुटकेचा विचार करण्याची वेळ सन २०३० मध्ये येईल. तेव्हा सरकार बघेल काय करायचंय ते.

Abu Salem
कार्ती चिदंरबरम यांच्या निवासस्थानी CBIची छापेमारी

१९९३ च्या मुंबई साखळी बॉम्बस्फोटात सहभाग उघड झाल्यानं त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली असून तो सध्या तुरुंगात आहे. त्यानं आपल्या याचिकेत म्हटलं की, भारत-पोर्तुगाल प्रत्यार्पण करारानुसार त्याला २५ वर्षांपेक्षा अधिक शिक्षा सुनावली जाऊ शकत नाही.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com